माझ्या मुलाचे वय ४५ वर्षे आहे. त्याच्या शरीरावर सतत चरबीच्या गाठी येत राहतात. २-३ वेळा शस्त्रक्रियाही केली, पण नंतर दुसऱ्या जागी गाठी आल्या आहेत. यावर शस्त्रक्रियेशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही, असे डॉक्टर म्हणतात. कृपया मार्गदर्शन करावे.
- माधुरी सबनीस, पुणे
उत्तर - चरबीच्या गाठी शरीरामध्ये येणे हा खरे तर आजार नाही. शरीरात चरबी चुकीच्या जागी एकत्र होऊ लागते. हा त्रास आनुवंशिक असलेला दिसतो. फार प्रमाणात व्यायाम सुरू केल्यावर प्रोटिन शेक्स वगैरे घेतल्यास काही काळाने व्यायाम बंद केल्यावर काही लोकांना अशा प्रकारचा त्रास होताना दिसतो. गाठीचा आकार वाढू नये व नवीन गाठी येऊ नयेत यासाठी आयुर्वेदिक उपचार करता येतात. संपूर्ण शरीराला नियमित अभ्यंग करणे चांगले.