Health Care News : नाचणीमध्ये दडलेला आहे आरोग्याचा खजिना, जाणून घ्या त्याचे फायदे, आणि खाण्याची योग्य पद्धत

अशा या बहुगुणी नाचणीचे असंख्य फायदे आहेत. चला तर मग नाचणी खाण्याचे आणखी काय फायदे आहेत जाणून घ्या.
ragi
ragisakal
Updated on

नाचणी अत्यंत पौष्टिक असून शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. नाचणीचे वेगवेगळे पदार्थ करुन आहारात समावेश करता येऊ शकतो. नाचणीमुळे वजन नियंत्रणात राहते. पोटदुखी, अपचन तक्रारी दूर होतात.

अशक्तपणा दूर होतो. कंबर दुखत असल्यास नाचणीची पेज प्यावी.शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. अशा या बहुगुणी नाचणीचे असंख्य फायदे आहेत. चला तर मग नाचणी खाण्याचे आणखी काय फायदे आहेत जाणून घ्या.

नाचणीमध्ये कोणते पोषक घटक आढळतात?

नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. 100 ग्रॅम नाचणीमध्ये सुमारे 8 ग्रॅम प्रथिने असतात. त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाणही जास्त असते. नाचणीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स देखील आढळतात.

ragi
Health Care News : तुम्हाला माहीत आहे का सकाळी रिकाम्या पोटी चिमूटभर हळद खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या

नाचणीचे फायदे

नाचणीमध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

नाचणी वजन कमी करण्यासाठी गुणकारी आहे.

यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. हे खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.

ऑस्टियोपोरोसिसने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी नाचणी खूप फायदेशीर आहे.

यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. हे पचन सुधारते, आतड्याच्या हालचालीसाठी फायदेशीर आहे आणि रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करते.

हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी नाचणीचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे किंवा ज्यांना वारंवार थकवा जाणवतो आणि अशक्तपणा जाणवतो त्यांनी हे जरूर खावे.

असा करा नाचणीचा वापर

नाचणीचा आहारात अनेक प्रकारे समावेश करता येतो.

डोसा, इडली आणि उपमा हे नाचणीच्या पिठापासून बनवले जातात.

नाचणीपासून रोटी आणि पराठाही बनवता येतो.

तुम्ही भाज्या आणि नाचणीचे पीठ मिक्स करूनही सूप बनवू शकता.

खिचडी, लापशी आणि लाडूही नाचणीपासून बनवले जातात.

फेस मास्क देखील नाचणीच्या पिठापासून बनवला जातो.

Related Stories

No stories found.