Soacked cashew vs Soacked Walnut: भिजवलेले शेंगदाणे, कडधान्य आणि सुकामेवा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. सुकामेव्यामध्ये काजू, बदाम, अक्रोड यांचा समावेश होतो. काजूमध्ये ५ टक्के आणि अक्रोडमध्ये ०.१-९.४ टक्के पर्यंत फायटिक अॅसिड असते, जे पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणू शकते आणि काही लोकांच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. पण काजू आणि अक्रोड भिजवून खाल्ल्यास पचनसंस्था सुरळित राहते. तसेच अनेक आरोग्यदायी फायदे देखील होऊ शकतात.