आजकाल ‘रेडी टू इट’ खाद्यपदार्थांना चांगलीच मागणी वाढली आहे. हे खाद्यपदार्थ तरूणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. हे खाद्यपदार्थ लोकप्रिय होण्यामागचे कारण म्हणजे हे पटपट होणारे खाद्यपदार्थ आहेत. हे खाद्यपदार्थ करायला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि झटपट हे पदार्थ तयार होतात.
पॅकेटमध्ये येणाऱ्या या खाद्यपदार्थांची चव सर्वांनाच आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. शिवाय, आजकाल नोकरी करणाऱ्या लोकांना सगळं कस झटपट हवं असत. १ तासभर स्वयंपाक करायला ही आजकाल कुणाला वेळ नसतो. विशेषत: ज्या घरात नवरा-बायको दोघे ही जॉबला असतात तेव्हा ते रेडी टू इट खाद्यपदार्थांची मदत घेतली जाते.
परंतु, तुम्हाला हे माहित आहे का ? की हे खाद्यपदार्थ आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत. जर तुमच्या आहारामध्ये या रेडी टू इट खाद्यपदार्थांचा समावेश असेल तर वेळीच सावध व्हा. आज आपण रेडी टू इट खाद्यपदार्थांचे आपल्या आरोग्याला होणारे तोटे जाणून घेणार आहोत.
‘रेडी टू इट’ या खाद्यपदार्थांमधून तुम्हाला भले ही चव मिळत असेल मात्र, यातून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पोषकतत्वे मिळत नाहीत. या खाद्यपदार्थांमध्ये व्हिटॅमिन्स, फायबर्स आणि खनिजे यांचा अभाव आढळून येतो. त्यामुळे, रेडी टू इट खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला फक्त चव मिळते मात्र, पोषकघटक मिळत नाहीत.
अनेक प्रकारच्या ‘रेडी टू इट’ खाद्यपदार्थांमध्ये अनसॅच्युरेटेड आणि ट्रांन्स फॅट्सचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे, जेव्हा हे पदार्थ खाल्ले जातात तेव्हा या पदार्थांमुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याचा धोका असतो. शिवाय, यामुळे हृदयविकाराचा धोका ही वाढतो.
'रेडी टू इट' खाद्यपदार्थ अधिक चवदार लागण्यासाठी आणि ते चिरकाळ टिकण्यासाठी त्यामध्ये सोडिअम म्हणजेच मीठ जास्त प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे, या खाद्यपदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्याला हाय बीपीचा त्रास संभवतो. तसेच, हृदयविकार होण्याची शक्यता असते. या कारणामुळे, हे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका असतो.
‘रेडी टू इट’ खाद्यपदार्थ जास्त दिवस टिकण्यासाठी आणि ते आकर्षक दिसण्यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रिझरवेटिव्हजचा समावेश केला जातो. शिवाय, विविध फ्लेवर्स, आर्टिफिशिअल रंग ही वापरले जातात. त्यामुळे, या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.