Viral Video: जेजे हॉस्पिटलमध्ये खरंच हार्ट अ‍टॅकवर फक्त ५ हजारात उपचार ? व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं समोर

Heart Attack: सध्या सोशल मिडियावर मुंबईतील जेजे हॉस्पिटलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये फक्त ५ हजारात कॅन्सरवर उपचार केला जाईल असे सांगण्यात आले आहे.
Heart Attack | Viral Video
Heart Attack | Viral VideoSakal
Updated on

Viral Video on Heart Attack: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत अयोग्य खाण-पाण आणि व्यायामाचा अभाव असल्याने अनेक आजार उद्भवतात. यात अनेकांना हार्ट अटॅकच्या समस्यांना सामोरे जावे लागते. सर्व लोकांसाठी हा विषय महत्वाचा आहे. सध्या सोशल मिडियावर मुंबईतील जेजे हॉस्पिटलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये फक्त ५ हजारात कॅन्सरवर उपचार केला जाईल असे सांगण्यात आले आहे. अनेक लोकांनी व्हिडिओवर विश्वास ठेवला आहे. पण हा दावा खरंच आहे का याबाबत साम वृत्तवाहिनीने पडताळी केली आहे.

काय आहे दावा

व्हायरल होत असलेल्या मॅसेज सोबतच एक व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये सांगितले की "आता हार्ट अटॅकची चिंता सोडा. नवीन तंत्रज्ञान जेजे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. फक्त ५ हजार

रूपयांमध्ये हार्ट ब्लॉकेज डायरेक्ट काढले जातील आणि एक गोळी अन्ननलिकेचा कॅन्सरचे निदान करते.

Heart Attack | Viral Video
Beard Men: दाढी असलेले पुरूष खरंच रोमँटिक असतात का? यामागचं संशोधन नेमकं काय सांगतं...

काय आहे सत्य

जेजे हॉस्पिटलमध्ये हार्ट ब्लॉकेजवर उपचार मिळतात का? एक गोळी खरंच कॅन्सर बरा करू शकते का? असे प्रश्न पडल्यावर साम वृत्तवाहीनीने या गोष्टीची पडताळणी केली आहे. तेव्हा व्हायरल झालेला हा व्हिडिओ केब्रिज विद्यापीठाचा आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील तंत्रज्ञान कॅन्सरवर निदान करण्यासाठी आहे.

जेजे हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफी, अँजिप्लास्टी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत करण्यात येते. अन्ननलिकेचा कॅन्सर शोधण्यासाठी एन्डोस्कोपी आणि बायोस्पी करण्याची आवश्यकता असते. कॅन्सर शोधण्यासाठी कोणतेही गोळी आलेली नाही. त्यामुळे हा दावा खोटा आहे. जेजे हॉस्पिटलच्या नावाने लोकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा खोट्या माहितीपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()