Urine Problem : यूरिन करताना त्रास होण्यामागे आहेत ही गंभीर कारणे

लघवीमध्ये वेदना किंवा जळजळ होण्याचे हे देखील एक कारण असू शकते. हा संसर्ग असुरक्षित संभोगामुळे होऊ शकतो.
Urine Problem
Urine Problemgoogle
Updated on

मुंबई : अनेकांना लघवी करताना तीव्र वेदना किंवा जळजळ जाणवते. यामागे अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये UTI हे मुख्य आहे. इतर अनेक संसर्गामुळेही ही समस्या उद्भवू शकते. ही समस्या स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही होऊ शकते मात्र ती महिलांमध्ये अधिक सामान्य आहे.

अनेक वेळा लाजाळूपणामुळे लोक त्यावर बोलत नाहीत. विशेषत: महिला याकडे दुर्लक्ष करतात, पण वेळीच याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. डाएटिशियन नेहा महाजन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लघवी करताना वेदना होऊ शकतात अशा कारणांची माहिती शेअर केली आहे. (reasons of pain during urination urine problems)

मूत्राशय किंवा मूत्रपिंडात खडे

लघवी करताना वेदना होण्याचे हे देखील एक कारण असू शकते. मूत्रपिंड किंवा मूत्राशयातील स्टोनची समस्या आजच्या काळात सामान्य आहे. किडनीमध्ये स्टोन झाल्यामुळे अनेक वेळा लघवीला अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे लघवी करताना वेदना होतात.

लैंगिक संक्रमित संसर्ग

लघवीमध्ये वेदना किंवा जळजळ होण्याचे हे देखील एक कारण असू शकते. हा संसर्ग असुरक्षित संभोगामुळे होऊ शकतो. त्याची लक्षणे वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे कारण हा संसर्ग वाढल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. योनीमध्ये खाज सुटणे आणि स्त्राव होणे हे देखील त्याची लक्षणे असू शकतात.

मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग

यूटीआय ही महिलांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य समस्या आहे. लघवी करताना जळजळ होणे किंवा वेदना होणे, वारंवार लघवी होणे आणि रात्री लघवी करण्याची इच्छा वाढणे, लघवीमध्ये रक्त येणे ही सर्व UTI ची लक्षणे आहेत.

हे संसर्ग जेव्हा मूत्रमार्गात असलेल्या अवयवांमध्ये बॅक्टेरिया प्रवेश करतात तेव्हा होते. औषधांच्या मदतीने तो बरा होऊ शकतो परंतु स्वच्छतेची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे.

मूत्रपिंड संसर्ग

जर तुम्हाला लघवी करताना वेदना होत असतील, तर याचे एक कारण किडनी इन्फेक्शन असू शकते. मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे लघवी करताना वेदना आणि जळजळ देखील जाणवू शकते. जरी त्याची इतर अनेक लक्षणे आहेत परंतु हे देखील त्यापैकी एक आहे. किडनीच्या संसर्गावर वेळीच उपचार न केल्यास त्याचा खूप त्रास होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.