How To Get Rid Of Belly Fat Quickly : प्रत्येकाकडे नैसर्गिक पध्दतीने वजन(weight) कमी करण्यासाठी एकमात्र उपाय म्हणजे व्यायाम (exercise), पण वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे हा एकमात्र मार्ग नाही त्याशिवाय वजन कमी करण्याच्या (Weight Loss) टिप्स आणि ट्रिक्सवर नैसर्गिक पध्दतीने काम करणे गरजेचे आहे. वेट लॉस डाएटसोबत कित्येक लोक वजन कमी करण्यासाठी अवघड व्यायाम करण्याचा प्रयत्न करतात. व्यायामासाठी लोकांचा आवडता वेळ असतो. सकाळी उठणे काही लोकांसाठी अवघड काम असते. अनेकांना सकाळी अवघड कसरत करण्यासाठी पुरेशी ऊर्जा असल्याचे वाटत नाही. व्यायाम हा कॅलरी (Calories) कमी करण्याचा आणि स्नायू बळकट करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, म्हणून त्यासाठी कोणतीही सबब देऊ नका. त्याऐवजी, तुमचा व्यायाम सोपा आणि परिपूर्ण करा. जास्त प्रयत्न न करता पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करण्याच्या काही सोप्या टिप्स फॉलो करा(reduce belly fat faster 3 effective ways without doing much exercise)
वजन कमी करण्यासाठी व्यायाम करण्याच्या सोप्या टिप्स (Exercise Tips That Make Weight Loss Easier)
व्यायाम खूप गरजेचा असतो, पण जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असला तर ते आणखी महत्त्वाचे ठरते. कित्येक लोक अजूनही घरातून काम करत आहेत. सध्या लोकांना सोप्या आणि पटकन करता येईल अशा वर्कआऊट रुटीनची गरज असते. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या मेटाबॉलिज्म वाढवायचे असेल तर आपल्या फिटनेस रुटीमध्ये वेट ट्रेनिंग समाविष्ट करणे अत्यंत फायदेशीर ठरते.
१. धावणे :
धावणे आणि वजन कमी करणे हे दोन्ही एकत्र कसे फायदेशीर आहे तुम्हाला जाणून घेतले पाहिजे. योग्य प्रकारे ट्रिक्ससोबत आपले धावण्याचे रुटिन तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करू शकते. मग तुमच्या धावण्याची गती किंवा अंतर कितीही असो. तुम्हाला आवडत असो किंवा नसो, वजन कमी करण्यासाठी धावणे हा एक उत्तम व्यायाम आहे. त्यासाठी तुम्हाला ट्रेडमिलची आवश्यकता नाही. पण जर तुम्ही कधी व्यायाम केला नसेल तर तुम्ही सुरुवात धावण्यापासून करू शकता त्यामुळे अधिक कॅलरीज बर्न करू शकतात.
स्ट्रेंथ ट्रेनिंग हे तुमच्या शरीराचे वजन वापरून किंवा वजन उचलून( वेट लिफ्टिंग) वजन कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. प्रतिकार म्हणून तुमच्या शरीराचे वजन वापरणे हा कसरत करण्याचा एक प्रभावी आणि सोयीस्कर मार्ग आहे. तुमच्याकडे जितके जास्त स्नायू असतील तितकी तुमची फॅट बर्न होतील, कारण तुमची चयापचयक्रिया जलद होते आणिएक हाई मेटाबॉलिज्म पेक्षा जास्त कॅलरी बर्न होतात.
झुंबा हा एक हाय एनर्जेटिक अॅरोबिक व्यायाम आहे. यात तुमचा कोर आणि इतर मुख्य स्नायू जसे की abs, glutes, triceps, hamstrings, quadriceps, इत्यादींचा समावेश आहे, ज्यांना एक्स्ट्रा पुश आवश्यक आहे. झुंबा शरीरातील चरबी, विशेषतः पोटाची चरबी कमी करण्यासाठी ओळखला जातो आणि कोणत्याही उपकरणावर अवलंबून न राहता तुम्ही सिक्स-पॅक अॅब्स तयार करू शकता.
नियमित व्यायामाचे फायदे अभूतपूर्व आहेत. तुम्ही कोणत्या वेळी व्यायाम करता याने काही फरक पडत नाही. आपण नियमितपणे व्यायाम केल्यास हे सर्वात महत्त्वाचे आहे. खूप व्यायाम करणे नेहमीच चांगले नसते आणि आपल्या शरीराला आराम आणि दुरुस्ती करण्याची संधी देणे महत्वाचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.