Relationship Tips : या ‘पाच’ चुका टाळा नाहीतर तुमचे लैंगिक जीवन उध्वस्त होईल

या किरकोळ कारणांमुळे त्यांच्यामधील लैंगिक संबंध कंटाळवाणे होतात
Relationship Tips
Relationship Tipsesakal
Updated on

पुणे : क्षितिज आणि प्रिया एक टिपिकल कपल. सगळेच राहतात तस ते ही काही वर्षे एकत्र होते. अगदी सगळ्यांच्यात होत तसच त्यांच्यातही भांडण व्हायचं. पण कोणीतरी माघार घेतली की ते मिटून जायच. प्रेम, विश्वास आपुलकी हे सगळं होतं. पण त्याचबरोबर वाद ही होताच. काही किरकोळ कारणांमुळे त्यांच्यामधील लैंगिक संबंध कंटाळवाणे झाले होते. त्यामुळे दोघांनाही नात्याचा कंटाळा आला होता.

Relationship Tips
Relationship Tip : पुरुषांनो स्त्रीयांबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात बरं

पार्टनरसोबत बोलणेच नव्हे तर राहणेही नकोसे वाटते. याचा परिणाम त्या नात्यावर होतो. त्यामुळे त्या दोघांचे नातेच नाही तर संपूर्ण कुटूंब उध्वस्त होते. यासाठी नात्यात नक्की काय चुकतेय हे पाहणे आवश्यक आहे. तुम्‍ही आनंदी नसल्‍यावर वाईट मूडमध्‍ये, भावनिक अशांततेतून जात असल्‍यावर, तुम्‍हाला लैंगिक संबंध करण्‍याची इच्छा होणे कठीण असते. जाणून घेऊया तणावाचा तुमच्या लैंगिक जीवनावर कसा वाईट परिणाम होतो.

Relationship Tips
Relationship Tips: तुम्हालाही सुखी जोडप होयचयं, मग फॉलो करा या सवयी

ऑफिसचा वर्कलोड

ऑफिसचे वर्कलोड घेतल्याचा थेट परिणाम तुमच्या लैंगिक जीवनावर होतो. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तणावामुळे व्यक्ती लैंगिक संबंध प्रस्थापित करताना व्यक्तीचे मन एकाग्र होत नाही. यामुळे कॉर्टिसोलची पातळी वाढते, जी मूड किलर म्हणून काम करते. कारण यामुळे टेस्टोस्टेरॉन आणि इतर हार्मोन्सची निर्मिती थांबते. त्यामुळे लैंगिक संबंध यशस्वी होत नाहीत.

Relationship Tips
Relationship Tips : प्रत्येक गोष्टीत पार्टनर तुम्हाला दोष देतो?

अपूरी झोप

अपूरी झोप ही अनेक रोगांचे कारण आहे. झोप चांगली झाली की दिवसही चांगला जातो. पण अपूऱ्या झोपेमुळे थकल्यासारखे वाटते. त्यामुळे रात्री कधी एकादा झोपतो असे वाटते. त्यामुळे लैंगिक संबंध ठेवणे शक्य होत नाही. झोपेचे आणि संबंधाचे यमक जुळवण्यासाठी चांगला आहार आणि कमी ताण घेणे गरजेचे आहे.

Relationship Tips
Relationship Tips : 'या' 5 गोष्टी सांगतात तुमची लगीन गाठ सैल झाली, वेळीच सावध व्हा

हार्मोन्सचे असंतूलन

ताणतणाव आणि अवेळी जेवण यामुळे शरीरातील हार्मोन्स असंतूलीत होतात. यामुळे तूमच्यातील लैंगिक उत्तेजना कमी होते. काही लोकांमध्ये टेस्टोस्टेरोन कमी प्रमाणात तयार होते. त्यामुळेही संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

Relationship Tips
Relationship Tips : नवरात्रीत Sex करावा का?

रोजची भांडणं

घरातील रोजच्या भांडणाचा जोडप्यांच्या लैंगिक संबंधावर थेट परिणाम होतो. त्यांच्यातील प्रेम कमी होऊ लागल्याचे त्यांना जाणवते. त्यासाठी भांडणे न करता किंवा झालेलं भांडण पटकन मिटवून एकमेकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भांडणांमुळे तुमच्या मनात जोडीदाराबद्दल द्वेष निर्माण होतो. असे होऊ नये यासाठी दोघांनीही समजूतदारपणे वागले पाहिजे.

Relationship Tips
Relationship Tips: तुमचं रिलेशनशिप Perfect आहे का?

असंतुष्ट सेक्स

अनेक वेळा असे घडते जेव्हा लोक आपल्या जोडीदाराला संतुष्ट करू शकत नाहीत. हे सहसा पुरुषांसोबत घडते. तसे असेल तर दोघांनीही चर्चा करावी. आवडी-निवडीची काळजी घ्यावी. याशिवाय कमकुवत शरीर हेही यामागील मोठे कारण आहे. यासाठी चांगला आहार घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.