Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Retinal Detachment : आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढांवर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली आहे.
Retinal Detachment
Retinal Detachmentesakal
Updated on

Retinal Detachment : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देशात विविध पक्षाच्या नेत्यांच्या रॅली आणि प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. या सगळ्या धामधुमीमध्ये आम आदमी पार्टीचे बहुचर्चित तरूण नेते राघव चड्ढा (raghav chadha) हे अनेक सभांपासून दूर आहेत.

आम आदमी पक्षाच्या अनेक प्रचारसभांना त्यांची अनुपस्थिती देखील दिसून आली. त्यामुळे, ते सध्या कुठे आहेत? अशी ही चर्चा सुरू झाली. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, राघव चड्ढा सध्या डोळ्यांच्या उपचारांसाठी ब्रिटनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून डोळ्यांच्या एका दुर्मिळ आजारासोबत त्यांची झुंज सुरू होती.

परंतु, त्यांच्या डोळ्यांवर नुकतीच शस्त्रक्रिया (Retinal Detachment) करण्यात आली असून ते सध्या लंडनमध्ये आराम करत आहेत. राघव चड्ढांच्या डोळ्यांना रेटिनल डिटॅचमेंट हा आजार झाला होता. डोळ्यांचा हा आजार नेमका काय आहे?  आणि त्याची लक्षणे काय आहेत? ते आपण जाणून घेणार आहोत.

Retinal Detachment
Parineeti Chopra : पतीसाठी परिणीतीच्या लंडनला फेऱ्या; राघववर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

रेटिनल डिटॅचमेंट आजार नेमका काय आहे?

रेटिना म्हणजे डोळ्यातील पडदा होय. हा डोळ्यांचा अतिशय नाजूक आणि महत्वाचा भाग आहे. डोळ्यांचा मागील बाजूस असलेला हा टिश्यूचा एक थर आहे. जो प्रकाश शोधतो आणि प्रकाश दिसल्यावर त्याचा सिग्नल मेंदूला पाठवतो. हा सिग्नल मिळाल्यावर तुम्ही पाहू शकता.

जेव्हा हा थर आधार देणाऱ्या पेशींपासून (Supporting Tissues) वेगळा होतो, तेव्हा डोळ्यांना रेटिनल डिटॅचमेंट हा आजार होतो. डोळ्यांच्या रेटिनाला या आधार देणाऱ्या पेशींमधूनच ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा होतो. पेशींचा आधारच नाही मिळाला की परिणामी डोळ्यांतील पडदा रक्तपुरवठा कमी करते आणि दृष्टी कमी होते. (What exactly is retinal detachment disease?)

रेटिनल डिटॅचमेंट आजाराची लक्षणे कोणती?

  • डोळ्यांची दृष्टी कमी होणे.

  • डोळ्यांना अंधूक दिसणे.

  • डोळ्यांतील चमक कमी होणे.

  • डोळ्यांच्या दृष्टीच्या मध्यभागी गडद सावली दिसणे किंवा अंधार जाणवणे.

  • डोळ्यांवर छोटे काळे डाग दिसणे.

    (symptoms of retinal detachment disease)

Retinal Detachment
Eye Makeup Tips : उन्हाळ्यात डोळ्यांना काजळ लावताना अशी घ्या काळजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.