Rheumatoid Arthritis : वातरोगाने दिव्यांगत्वाचा धोका, वेळीच करा औषधोपचार

शरीरासोबत मनाची तयारी, या विकाराचे दुखणे कमी करण्यास मदत करते
Rheumatoid Arthritis
Rheumatoid Arthritis esakal
Updated on

Rheumatoid Arthritis : रुमॅटॉईड आॅर्थरायटिस सामान्यपणे आढळणारा वातरोग आहे. सांध्यांना दीर्घकालीन वेदना व दाह होते. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती स्वतःच्या शरीरावरच आक्रमण करून त्यास इजा करू लागते, तेव्हा संधिवात होतो.

एक हजार लोकांमध्ये सात लोकांना संधिवात असतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये दोन-तीनपटीने अधिक आढळतो. दिव्यांगत्व येण्याचा धोका आहे, यामुळे औषधोपचार केला तर वातरोगावर पूर्ण नियंत्रण येते. व्यंगत्व टाळता येऊ शकते. रुमॅटॉईड आॅर्थरायटिस हा संधीवाताला वय नसते. कोणत्याही वयात तो होतो.

४८ ते ६० वर्षे वयोगटांत अधिक आढळतो. सांध्यांच्या लाईनिंगवर(सायनोव्हियम) परिणाम होऊन वेदनादायक सूज येते, लालसरपणा येतो. कालांतराने सांधे झिजू लागतात. व्यंगत्व येऊ शकते. उपचारांद्वारे रुमॅटॉईड आॅर्थराइटिसच्या वेदना कमी करता येतात, मात्र उपचारांचे ध्येय हे केवळ वेदनाशमन करण्यापूरते मर्यादित नसते, असे संधिवातरोगतज्ज्ञ डॉ. परीक्षित सगदेव यांनी सांगितले.

Rheumatoid Arthritis
Health Care News : चहा-कॉफीमध्ये साखर टाळण्यासाठी 'या' गोष्टींचा करा वापर

लक्षणे

सकाळच्या वेळेस वेदना

सांध्यांमध्ये अकडण

सांधे तापणे व लालसर

सांध्यांवर सूज येणे

डोळे व तोंड कोरडे पडणे

थकवा व अशक्तपणा

सौम्य ताप असणे

त्वचेवर गाठी येणे

हातापायांना मुंग्या येणे

भूक कमी होणे

Rheumatoid Arthritis
Health Tips In Asthma : वातावरण बदलताच अस्थमाचा त्रास वाढलाय? या गोष्टींचे सेवन करा अन् राहा फिट

रुमॅटॉईड आॅर्थरायटिस हा दीर्घकाल चालणारा विकार आहे. विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी वेळेत औषधोपचार करावा. डीमार्ड तसेच अत्याधुनिक बॉयोलॉजिक औषधे यावर प्रभावी आहेत. या औषधांमुळे आराम मिळतो. मात्र ही औषधे मुळापासून कार्य करीत असल्याने संयम ठेवावा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासोबत जीवनशैली संतुलित ठेवणे आवश्यक आहे. शरीरासोबत मनाची तयारी, या विकाराचे दुखणे कमी करण्यास मदत करते. (Health)

- डॉ. परीक्षित सगदेव, वातरोगतज्ज्ञ, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.