Roti Roast On Gas : तुम्हीही फुलके थेट गॅसवर भाजता काय? होऊ शकतो जीवघेणा आजार, तज्ज्ञ सांगतात...

तुम्हीही फुलके गॅसवर भाजत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी किती जीवघेणं ठरू शकतं याची कल्पना कदाचितच तुम्हाला असेल
Roti Roast On Gas
Roti Roast On Gasesakal
Updated on

Roti Roasting On Gas Side Effects : जेवताना गरम गरम फुलका ताटात मिळाला तर जेवणाची मजा आणखी दुप्पट होते. बहुतेकांना गॅसवर भाजलेला गरम फुलका खायला आवडतो. फुलका एका बाजूने ताव्यावर भाजून झाल्यानंतर थेट गॅसवर भाजतात. तुम्हीही फुलके गॅसवर भाजत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी किती जीवघेणं ठरू शकतं याची कल्पना कदाचितच तुम्हाला असेल. तज्ज्ञ याबाबत काय सांगतात ते एकदा वाचाच.

सध्या लोक आरोग्याबाबात एवढे सतर्क झाले आहेत की आरोग्याबाबतच्या अप़डेट्स सतत सोशल मीडियावर वाचत असतात. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामधे गॅसवर चपाती भाजणं आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे म्हटले गेलेय. एका संशोधनातूनही असे समोर आले आहे की गॅसवर अशाप्रकारे फुलके भाजल्याने कँसरचा धोका वाढतो.

काय सांगतो तज्ज्ञांचा अभ्यास?

जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये एक संशोधन करण्यात आलं. या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, कुकटॉप्स आणि एलपीजी गॅस स्टोव्हपासून नायट्रोजन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइड यासारखे अनेक धोकादायक वायू उत्सर्जित होत असतात. हे वायू आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने म्हटलं आहे. या धोकादायक वायूपासून श्‍वसनाच्या आजारांसोबतच कॅन्सर आणि हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. एवढंच नाही तर आपल्या जीवाला धोका निर्माण होतो असंही या अभ्यासातून सांगण्यात आलं आहे.

Roti Roast On Gas
Roti Rice In Diet: रोज जेवणात चपाती भात खाताय? हे वाचून तुमचे बरेच गैरसमज दूर होतील...

अशी चपाती बनवणे धोकादायक आहे

न्यूट्रिशन अँड कँसर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या दुस-या करेक्शनुसार असा दावा करण्यात आला आहे की रोटी कुकिंगमुळे कर्करोग होतो, त्याचे विभाजन केल्यावर कर्करोगजन्य पदार्थ तयार होतात. त्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे दम्याच्या रुग्णांना अधिक त्रास होतो. (Kitchen)

Roti Roast On Gas
Weight Loss and Cancer: वाढणारा लठ्ठपणा योग्य वेळी अशा पद्धतीने रोखा, नाहीतर वाढेल कर्करोगाचा धोका!

खरंच पोळी गॅसवर भाजल्याने कर्करोग होतो का?

ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ डॉ. पॉल ब्रेंट यांच्या मते, गॅस स्टोव्हच्या आचेवर फुलके किंवा भाकरी थेट भाजली तर त्यातून ऍक्रिलामाइड नावाचं रसायन तयार होतं. जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. संशोधनातून असा दावा करण्यात आला असला तरी यात किती सत्य दडलंय हे सांगण कठीण आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या माहितीनंतर लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Health)

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()