स्निग्ध पदार्थ आणि तेलांची भूमिका

स्निग्ध पदार्थ आणि तेलांचे उपयोग, शरीरावर, आरोग्यावर होणारे परिणाम यांच्याविषयी आपण माहिती बघत आहोत.
Food Oil
Food Oilsakal
Updated on

- गौरी शिंगोटे, आर. डी., सी.ई.ओ. जुविनेट वेलबिंग

स्निग्ध पदार्थ आणि तेलांचे उपयोग, शरीरावर, आरोग्यावर होणारे परिणाम यांच्याविषयी आपण माहिती बघत आहोत. लोणी, सुक्या मेव्याची तेले, बियांची तेले, वनस्पती तेले आदींबाबत आपण गेल्या आठवड्यात विस्ताराने माहिती बघितली. आता इतर काही गोष्टी बघू.

  • ऊर्जेची साठवण : ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करतात.

  • पोषण शोषण : स्निग्ध पदार्थांत शोषली जाणारी जीवनसत्त्वे अ, ड, ई, के शरीरात शोषली जाण्यास मदत करतात.

  • पेशींचे कार्य : पेशींचे कार्य व पेशीपटलाची रचना यांचा अविभाज्य घटक आहे.

  • हार्मोन निर्मिती : हार्मोन्सच्या संश्‍लेषणात सहभाग असतो.

  • निरोधन आणि संरक्षण : शरीरातील महत्त्वाच्या अवयवांचे निरोधन आणि संरक्षण करतात.

आरोग्यावरील परिणाम

१. संयमित चरबी सेवन

  • मेंदूच्या कार्यास मदत करते, हार्मोननिर्मिती व पोषण शोषणास मदत करते.

  • ओमेगा-३ व ओमेगा-६ फॅटी ॲसिड्सच्या संतुलित सेवनाने सूज कमी होण्यास मदत होते.

  • मोनोअनसॅच्युरेटेड व पाॅलिअनसॅच्युरेटेडमुळे हृदय आरोग्याला प्रोत्साहन देते.

२. जास्तीचे चरबी सेवन

  • वजन वाढते व स्थूलत्व येते.

  • सॅच्युरेटेड आणि ट्रान्सफॅट्सच्या सेवनामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

  • मधुमेहासारखे चयापचयाचे विकार उद्‍भवण्यास मदत होते.

३. अपुरे चरबी सेवन

  • जीवनसत्त्वांचे शोषण होण्यास अडथळा निर्माण होऊन शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता होते.

  • मेंदूचे कार्य व हार्मोनच्या संतुलनात अडथळा निर्माण होतो.

  • त्वचेचा कोरडेपणा वाढून रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

स्निग्ध पदार्थ व तेलांचा स्वयंपाकातील उपयोग

  • लोणी आणि तूप : पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी, परतणे व भाजणे तसेच बेकिंगसाठी चांगले.

  • प्राणिजन्य चरबी : तळणे, भाजणे व स्वादासाठी.

  • सुक्या मेव्याची तेले : कमी धगीच्या स्वयंपाकासाठी, सॅलडमध्ये वापरण्यासाठी व वरून घेण्यासाठी योग्य.

  • बियांची तेले : स्वयंपाकासाठी, बेकिंग व सॅलडसाठी अशी बहुपयोगी असतात.

  • कोंडा व वनस्पती तेले : तळणे, परतणे व मुरवण्यासाठी उत्तम.

  • हायड्रोजनयुक्त चरबी : सर्वसाधारणपणे बेकिंग आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थात वापरले जाते, परंतु याचे आरोग्यावर होणारे परिणाम पाहता, अल्प प्रमाणात खाल्ले जावेत.

आपले एकंदर आरोग्य सांभाळून दीर्घ मुदतीचे आजार दूर ठेवण्यासाठी स्निग्ध पदार्थांच्या सेवनाचे प्रकार आणि प्रमाण यांचा समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. संतुलन किंवा योग्य प्रमाण आणि विविधता ही स्निग्ध पदार्थ व तेलांमुळे होणारे धोके दूर करून जास्तीत जास्त फायदे करून घेण्याची गुरूकिल्ली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.