Roti with Milk Benefits : रात्री दूध आणि चपाती एकत्र खाल्ल्याने आरोग्यास अधिक फायदे होतात का?

याचा आरोग्याला काय फायदा होतो?
Roti with Milk Benefits
Roti with Milk Benefitsesakal
Updated on

Roti with Milk Benefits : दूध केवळ लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आयुर्वेदामध्ये दुधाला संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आला आहे. आयुर्वेदानुसार आपलं शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेलं आहे.

यानुसार जर तुम्ही वेळी-अवेळी कोणत्याही अन्नपदार्थांचं सेवन केलं तर या तत्त्वांचं संतुलन बिघडतं आणि आपल्याला आजारांची लागण होते. बहुतांश लोक दुधाचं नियमित स्वरुपात सेवन करतात. पण दूध पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहिती आहे का? आयुर्वेदानुसार दूध कोणत्या वेळेस प्यावे, हे जाणून घेऊया.

Roti with Milk Benefits
या बियांसोबत Milk चे सेवन केल्यास Bones होतील बळकट, एनर्जी बूस्ट करण्यासोबत अनेक फायदे

उत्तर भारतातील बहुतेक लोकांना रात्री चपाती आणि भाजी खायला आवडते. काही लोक रात्री दूध पितात. मुलांना दूध आणि चपाती एकत्र खायला दिली जात असली तरी मुलं नाक मुरडतात. तसे, दूध हे स्वतःच संपूर्ण अन्न आहे.

म्हणजेच शरीराला आवश्यक असलेले प्रत्येक पौष्टिक घटक त्यात असतात. पण चपाती हे आरोग्यासाठी योग्य अन्न नाही. पण असे असतानाही रात्री चपाती आणि दूध एकत्र खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे.

रात्रीच्या जेवणात दुध चपाती खाणे जास्त फायदेशीर आहे का? रात्री चपाती आणि दूध खाण्यात बहुतांश लोकांना त्रास होत असला, तरी रात्री चपाती  आणि दूध खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचा दावा केला जातो.

याबद्दल सत्य जाणून घेण्यासाठी, आम्ही डॉ. प्रियंका रोहतगी, मुख्य क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, अपोलो हॉस्पिटल्स, बंगलोर यांच्याशी बोललो. डॉ. रोहतगी यांनी हा दावा विज्ञानबाह्य ठरवला.  

Roti with Milk Benefits
Tasty Milk Recipes: दूध पिण्यासाठी तुमची मुलं नाक मुरडतात, मग या टिप्सच्या मदतीने बनवा Tasty... मुलंदेखील होतील खुष

ते खरोखर फायदेशीर आहे का?

डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सांगितले की, दूध हे निश्चितच एक पूर्ण अन्न आहे. म्हणजेच, त्यात प्रथिने पुरेशा प्रमाणात असतात, त्यानंतर कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अनेक अमिनो अॅसिड आणि इतर पोषक घटक असतात.

म्हणूनच डॉक्टर रात्री दूध पिऊन झोपण्याचा सल्ला देतात. पण रात्री दुधात मिसळून चपाती खाल्ल्याने आणखी काही फायदा होतो की नाही याबाबत वैद्यकीय शास्त्रात काहीही सांगितलेले नाही.

जर कोणी रात्रीच्या वेळी चपाती -दूध मिसळून खाल्ल्यास त्याचे तेच फायदे होतील जे वेगळे खाल्ल्याने मिळतात. पण जर कोणी रात्री दूध पिऊन झोपले तर त्याचे फायदे जास्त आहेत. प्रियांका रोहतगी यांनी सांगितले की, दुधामध्ये केसिन नावाचे एक संयुग असते जे एक प्रकारचे प्रथिन आहे.

यात अनेक प्रकारचे अमिनो अॅसिड असतात. प्रथिनांच्या तुलनेत ते खूप हळू पचते. कॅसिनमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमीनो ऍसिड असते जे स्लीप हार्मोन मेलाटोनिनचे उत्सर्जन वाढवते. यामुळेच रात्री दूध प्यायल्याने झोप चांगली लागते.

Roti with Milk Benefits
या बियांसोबत Milk चे सेवन केल्यास Bones होतील बळकट, एनर्जी बूस्ट करण्यासोबत अनेक फायदे

चपातीचा किती फायदा

डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सांगितले की, असे कोणतेही संशोधन नाही, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की रात्री दुधात मिसळून चपाती खाल्ल्यास अतिरिक्त फायदा होतो. चपातीचा प्रश्न आहे, गव्हाच्या पिठापासून बनवलेली चपाती मधुमेहाच्या रुग्णांसाठी फारशी चांगली नसते.

दुसरीकडे, जेव्हा तुम्ही दुधात मिसळून चपाती  खाता तेव्हा त्यामध्ये फॅट आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढते. यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. म्हणूनच रात्री झोपताना जर तुम्ही दूध प्यायले तर त्याचे फायदे जास्त होतात.

Roti with Milk Benefits
Milk Bread Dessert : दहा मिनिटात तयार होतो मिल्क ब्रेड डेझर्ट; रेसिपी आहे एकदम सोपी अन् चवही न्यारी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.