इनर इंजिनिअरिंग : नैराश्य आणि योग

नैराश्य हा शब्द केवळ वैद्यकीय नैराश्याबद्दल नाही. तुमच्या आयुष्यात दोन गोष्टी चुकीच्या झाल्या तर तुम्ही थोड्या प्रमाणात निराश होऊ शकता.
Yoga
YogaSakal
Updated on

नैराश्य हा शब्द केवळ वैद्यकीय नैराश्याबद्दल नाही. तुमच्या आयुष्यात दोन गोष्टी चुकीच्या झाल्या तर तुम्ही थोड्या प्रमाणात निराश होऊ शकता. माझ्यामते बहुतेक लोकं आयुष्यातील कोणत्या ना कोणत्या परिस्थितींमुळे निराश होतात, परंतु काही तासातच ते स्वतःशी बातचीत करून त्यातून बाहेर पडतात.

ते त्यासाठी एखादी प्रेरणा वापरतील - त्यांचं कुणासाठी असलेलं प्रेम, राष्ट्र, किंवा इतर काहीतरी जे त्यांच्या आयुष्यात त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यातून स्वतःला सांभाळून घेतील. एकतर तुम्ही स्वतःशी बोलून त्यातून बाहेर निघाल किंवा तुम्ही तुमच्या मित्रांशी बोलाल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये बोलाल, आणि मग ते तुमच्याशी बातचीत करून तुम्हाला त्यातून बाहेर काढतील; अन्यथा तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्याल.

नैराश्यातून पडण्याचा कोणताही मार्ग नसता, तर एक मनोवैज्ञानिक तुमच्या सोबत बसून कित्येक तास चर्चा का करेल? अर्थातच, त्यांना ठाऊक आहे की, ते तुमच्याशी संवाद करून तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकतात, अन्यथा वैद्यकीय मदत आहेतच.

रसायनशास्त्राच्यादृष्टीने विचार केला तर मानवी यंत्रणा हा या ग्रहावरील सर्वांत अत्याधुनिक कारखाना आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की, तुम्ही या रासायनिक कारखान्याचे उत्कृष्ट व्यवस्थापक आहात किंवा खराब व्यवस्थापक आहात. योगाचा अर्थ असा आहे की, तुम्ही तुमच्या स्वतःच्या रासायनिक कारखान्याचे एक अतिशय कार्यक्षम व्यवस्थापक बनता.

योगामुळे कोट्यवधी लोकांना फायदा झाला आहे, यात काही शंका नाही. आपल्याकडे पुरेशा अनुभवातून माहिती आहे, जे सिद्ध करते की, ते काम करते. परंतु आता रक्त चाचण्यांचा अभ्यास केला जात आहे आणि आपण स्पष्टपणे पाहत आहोत की योगिक पद्धतींद्वारे अगदी आनुवंशिक प्रकृतीदेखील बदलत आहेत.

तुम्ही केवळ योग्य साधना करून या मानसिक आजारांना फक्त प्रतिबंधच करू शकत नाही, तर तुम्ही ते योग्य मार्गाने केल्यास त्यातून बाहेरही येऊ शकता. फक्त एक समस्या अशी आहे की, एखादी व्यक्ती मानसिक उदासीनतेच्या स्थितीत असते तेव्हा त्यांना योगिक सराव करण्यास भाग पाडणे हे एक मोठे आव्हान असते. त्यांच्या सभोवताली त्यासाठी समर्पित लोकं नाहीत, जे त्यांना असे करण्यासाठी दररोज सर्व प्रकारे मदत करतील, तोपर्यंत तसे होणार नाही.

मी अशी तुम्हाला हजारो लोकं दाखवू शकतो, जे असं करून असंख्य मानसिक समस्यांतून बाहेर पडले आहेत, कारण आम्ही त्यासाठी एक पोषक वातावरण तयार करतो. असं प्रत्येक घरात घडवणं कदाचित शक्य होणार नाही. प्रश्न फक्त विनियोगाचा आहे. पण, अशा काही गंभीर केसेस आहेत ज्या फार हाताळण्यास कठीण आहेत. आम्ही अशा प्रकारच्या केसेससुद्धा पाहिल्या आहेत आणि त्यांची औषधांची गरज मोठ्याप्रमाणात कमी करू शकलो आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.