Shashankasana: वजन कमी करण्यासाठी शशांकासन फायदेशीर, जाणून घ्या पद्धत अन् फायदे

Shashankasana: तुम्ही वजन कमी करण्यासाठी अनेक पद्धती वापरून पाहिल्या असतील, पण तरीही कोणतेही परिणाम मिळत नसेल तर शशांकासन करू शकता.
Shashankasana:
Shashankasana:Sakal
Updated on

Shashankasana health benefits for weight loss know about how to do these yoga

जर तुम्ही लठ्ठपणा आणि तणावाने त्रस्त असाल तर ते टाळण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे योग. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकजण लठ्ठपणाने त्रस्त आहे. तुम्ही वजन कमी करण्यासाठी अनेक पद्धती वापरून पाहिल्या असतील, पण तरीही कोणतेही परिणाम मिळत नसेल तर शशांकासन करू शकता. चला तर मग जाणून घेऊया शशांकासन कसे करावे आणि त्याचे फायदे कोणते आहेत.

  • शशांकासन कसे करावे

शशांकासन करताना सर्वात आधी वज्रासनात बसावे. नंतर डाव्या हाताने कंबरेच्या मागे उजवे मनगट धरून बसावे. डोळे बंद करा. श्वास घ्या आणि नंतर श्वास सोडताना, डोके जमिनीला स्पर्श करेपर्यंत कंबरेपासून पुढे वाकवा. सहज श्वास घेऊन या स्थितीत दीर्घकाळ राहा. श्वास घेताना, सुरुवातीच्या स्थितीकडे परत या.

Shashankasana:
Yoga Tips: चमकदार अन् निरोगी त्वचेसाठी करा 'हे' योग, जाणून घ्या पद्धत

शशांकासन करण्याचे फायदे

शशांकासन केल्याने पोटावरची चरबी कमी होते.

हा योग केल्याने कंबर लवचिक राहते.

पोटासंबंधित असलेले आजार कमी होतात.

हृदयविकार असलेल्या लोकांसाठी हा योग फायदेशीर आहे.

हा योग नियमित केल्याने तणाव दूर होतो आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.