Cucumber Salad : धक्कादायक! काकडीमध्ये सलादचे घटक सर्वाधिक कमी, एक्सपर्टचा दावा

हिवाळ्यात काकडी खाता? मग हे वाचाच.
Cucumber Salad
Cucumber Saladsakal
Updated on

सध्या हिवाळ्यात आपण आरोग्याची विशेष काळजी घेतो. हिरव्या पालेभाज्या, सलाद यांचा समावेश आपण आहारात करत असतो. मग त्यात पालक, मेथी, कोथींबीर, शेपू तसेच काकडी, ब्रोकोली, गाजर अन् मुळा सारखे सलादही आपण रोजच्या जेवणात घेतो.

पण याबाबतच एक धक्कादायक अहवाल समोर आलाय. एका रिसर्च स्टडीनुसार काकडीमध्ये सलादचे घटक सर्वाधिक कमी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरंय. (Shocking Cucumber is the poorest salad ingredient experts said)

Louisiana State University School of Public Health द्वारे करण्यात आलेल्या रिसर्च स्टडीमध्ये ही बाब समोर आली आहे. अनेक लोक दररोज शरिराला आवश्यक ते न्युट्रीअंट मिळवण्यासाठी सलादचं सेवन करतात. ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटामिन्स, मिनरल्स, फायबर आणि प्रोटीनचा समावेश असतो.

यात सर्वाधिक सलादमध्ये आपण काकडीचा समावेश करतो. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते आणि लो कॅलरी फुड आयटम असल्याने आपण आवडीने काकडी खातो. पण या रिसर्च स्टडीनुसार काकडीमध्ये सलादचे घटक सर्वाधिक कमी आहेत.

Cucumber Salad
salad: कोशिंबीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या

या रिसर्च स्टडीनुसार काकडीमध्ये सर्वात कमी न्युट्रीअंट्स आहेत. चला तर जाणून घेऊया.

१. काकडी

कॅलरीज : 8

फॅट : 0.1 g

फायबर: 0.3 g

प्रोटीन- 0.3 g

व्हिटॅमिन के: 8.5mcg

व्हिटॅमिन सी : 1.5 mg

पोटॅशियम: 76.4mg

Cucumber Salad
Cucumber Idli: आता ब्रेकफास्टसाठी काकडी पासून बनवा झटपट इडली

बाकी गोष्टींध्ये किती न्युट्रीअंट आहेत ,जाणून घेऊया.

ब्रोकोली
प्रोटीन : 2.5g

व्हिटॅमिन सी : 81.2mg

कॅल्शिअम : 42.8mg

बेल पेपर
प्रोटीन: 1.5g

व्हिटॅमिन सी: 190mg

पोटॅशिअम : 314.4mg

व्हिटॅमिन ए : 233.9mcg

Cucumber Salad
Cucumber Thalipeeth Recipe : बनवा खूशखुशीत,खमंग अन् हेल्दी काकडीचे थालीपीठ

गाजर
व्हिटॅमिन ए : 509mcg

व्हिटॅमिन के: 8mcg

पोटॅशिअम 195.2mg

बेटा केरॉटीन 5053.8mcg

चेरी टोमॅटोज
मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.