Shocking News : बापरे... सलग दीड तास नवी कार चालवली तर आरोग्यावर होतो भयानक परिणाम, अभ्यासातून समोर..

नवीन कार घेतल्यावर चालवण्याचा आनंद खूप असतो. पण हीच नवी कार तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
Shocking News
Shocking Newsesakal
Updated on

Long Drive In New Car Is Hazards For Health : जर तुम्ही साधारण १२ दिवस कार उन्हात किंवा उघड्यावर पार्क केली. त्याला झाकलं नाही. तर अशा कार मधला प्रवास तुमच्या शरीरात कँसरचे कण सोडू शकतो. या विषयीचा अभ्यास अमेरिका आणि चीनच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार डिसइंफेक्टेंट, कीटाणूनाशक आणि गॅस स्टोव्हमध्ये आढळणारी फॉर्मलडिहाइड (Formaldehyde) कार मध्येपण आढळते.

चीनमध्ये कारच्या आत फॉर्मलडिहाइडचे प्रमाण राष्ट्रीय सुरक्षा मानकांच्या ३५ टक्के जास्त आढळली आहे. एसिटलडिहाइड (Acetaldehyde) चे प्रमाण ६१ टक्के जास्त आढळले आहे. एसिटलडिहाइड क्लास-२ स्तरावरचा कँसरचे घटक आहे. पेंट, पेट्रोल आणि सिगारेटमध्ये बेंजीन असतं. जे ड्रायव्हरच्या फुफ्फूसात जाऊन नुकसान पोहचवतात. जर तुम्ही खूप वेळ कार चालवत असाल तर बेंजीन धोकादायक आहे. पण यामुळे मागे बसलेल्या माणसाला तेवढं नुकसान होत नाही.

प्रत्येक नव्या कारमध्ये विविध प्रकारचे जैविक पदार्थांमुळे इंक्रीमेंटल लाइफटाइम कँसर रिस्क (ILCR) चा धोका वाढतो. जर ILCR चा स्तर १०-६ पर्यंत ठिक असतो. पण १०-६ ते १०-४ दरम्यान असेल तर त्यामुळे कँसरचा धोका वाढतो. जर १०-४ पेक्षा जास्त असेल तर धोका वाढतो. शास्त्रज्ञांनी कडक उन, पाऊस सगळ्याच ऋतूंमध्ये हा अभ्यास केला आहे.

११ तास ड्रायव्हिंग किंवा दीड तासाचा प्रवास नुकसानदायक

अभ्यासातून समजलं की, जर एखादा टॅक्सी ड्रायव्हर ११ तास आणि कोणी पॅसेंजर रोज दीड तास कारमध्ये प्रवास करत असेल तर हवेतले धोकादायक पदार्थ त्वचेतून तोंडात आणि मग शरीरात शिरतात. बहुतांशवेळा श्वासातूनच आत जातात. मीड साइज एसयूव्हीमध्ये प्लास्टिक, इमिटेशन लेदर अशा वस्तू असतात. जेव्हा ही कार नवीन असते. तेव्हा यातल्या हानिकारक घटकांचे प्रमाण जास्त असते.

वेगवेगळ्या तापमानात वेगवेगळे धोके

नवीन कारमधून निघणाऱ्या वायूला ऑफ गॅसिंग म्हणतात. वैज्ञानिकांनी कारच्या आतल्या हवेचे सँपल घेतले. त्यानंतर यात २० वेगवेगळ्या रसायनांचं मिश्रण आढळलं. ते ही वेगवेगळया तापमानात. जेव्हा कार उन्हात गरम होते तेव्हा त्याच्या आतलं तापमान २१ डिग्री सेल्सियस ते ६३ डिग्री सेल्सियस पर्यंत असते. तेव्हा धोकादायक घटक कारच्या आत वेगात फिरू लागतात. कारच्या आत असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंच्या पृष्ठभागाच्या तापमानामुळे हे घडते. येथे कारच्या आत असलेल्या हवेचे तापमान घेतले जात नाही.

वाचण्याचे उपाय

यापूर्वी कॅलिफोर्नियामध्ये एक अभ्यास करण्यात आला होता. ज्यात सांगण्यात आलं होतं की, नव्या कारला २० मिनीटं ड्राइव्ह केल्याने फार मोठ्या प्रमाणात बेंजीन आणि फॉर्मलडिहाइडचं एक्सपोजर असतं. सलग लांब पर्यंत कार चालवतात, त्यांना या एक्सपोजरचा धोका आणखी जास्त वाढतो. यापासून वाचण्यासाठीचे उपाय...

  • नवीन कार एक दिवसा आड वापरा.

  • सेकंड हँड कार घेणे फायद्याचे.

  • सार्वजनिक वाहनाने प्रवास करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.