कोरोनाची दहशत कायम! पुन्हा पुन्हा संक्रमित करणारा नवा व्हेरिएंट
कोरोनाने मागील दोन वर्षात हाहाकार माजवलाय. एकीकडे कोरोना कमी होत असल्याची चर्चा सुरू असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याचं चित्र समोर आलंय. कोरोनाचे एका मागोमाग एक नवनवीन व्हेरिएंटनी जगाची चिंता वाढवली आहे. विशेषत: अमेरिका आणि यूरोपमध्ये ओमिक्रोन (Omicron)च्या नव्या व्हेरिएंटनी तिथे हाहाकार माजवलाय. भारतातसुद्धा या व्हेरिएंटचे अनेक प्रकरणे समोर येताना दिसत आहे.
यात BA.5 हा खुप चर्चेत असलेला वेरिअंट आहे. आता या व्हेरिएंटबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. इन्फेक्शननंतर BA.5 काही आठवड्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा संक्रमित करू शकतो. अशामुळे एका महिन्यानंतर रूग्ण पुन्हा आजारी पडू शकतो. (Coronavirus latest update)
कोरोनावर जगभरात अभ्यास सुरू आहेत. ऑस्ट्रेलियन तज्ञांनी एका अहवालात म्हटले आहे की BA.2 प्रकाराने संक्रमित लोकांची संख्या वाढली आहे. यापैकी अनेकांना चार आठवड्यांत पुन्हा संसर्ग झाला आहे.या मागे BA.4 किंवा BA.5 प्रकार असू शकतात. काही तज्ञ या व्हेरिएंटमध्ये संक्रमण पसरण्याची सर्वाधिक जास्त शक्यता असल्याचे सांगत आहेत.
जगातील अनेक शास्त्रज्ञांनी या आधीच BA.4 किंवा BA.5ला महामारीचा कोरोनाची नवी स्टेप म्हटले. एका संशोधन अभ्यासात एक धक्कादायक माहिती समोर आली. BA.4 आणि BA.5 मध्ये BA.2 पेक्षा लसमध्ये असणाऱ्या ऍन्टीबॉडीजविरूद्ध चार पट जास्त प्रतिकारशक्ती आहे.ही प्रतिकारशक्ती लसीकरण विरोधात अधिक प्रभावी ठरते.यामुळे या व्हेरिएंटचे संक्रमण पुन्हा होण्याची शक्यता जास्त असते.
जर असे असेल तर सध्याच्या लसीचा फायदा काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. तज्ज्ञांचे मते, लसीची प्रतिकारशक्ती अजूनही फायदेशीर आहे. हे BA-4 आणि BA- 5 मुळे होणाऱ्या गंभीर आजारांपासून संरक्षण करते. अशा परिस्थितीत, लस घेणे खुप गरजेचे आहे.
कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामागील काही प्रमुख कारणे समोर आले आहेत. त्यात प्रामुख्याने सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. विमान प्रवास सुरू झालाय. राजकारणी आता कोरोनाविषयी सतर्कतेचे आवाहन करताना दिसत नाही. लोकांनी मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणेही बंद केले आहे.कोरोनाची अशी परिस्थिती पाहता प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.