Shri Shri Ravi Shankar Health Tips : स्टीलच्या भांड्याऐवजी या पानांत जेवण जेवणाचे आहेत खास फायदे

मधुमेह, डिप्रेशन आणि एन्झायटीचे रूग्ण या टिप्स फॉलो करून आनंदी आयु्ष्य जगू शकतात.
Shri Shri Ravi Shankar Health Tips
Shri Shri Ravi Shankar Health Tipsesakal
Updated on

Shri Shri Ravi Shankar Health Tips : निरोगी राहणे म्हणजे केवळ आजारांपासून दूर राहणे नव्हे. जगण्याच्या पद्धतींमध्ये चांगल्या सवयींचा समावेश असायला हवा. श्री श्री रविशंकरांचा जीवनाबाबत असाच काहीसा दृष्टिकोण आहे. त्यांनी निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. मधुमेह, डिप्रेशन आणि एन्झायटीचे रूग्ण या टिप्स फॉलो करून आनंदी आयुष्य जगू शकतात.

प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, अलीकडील एका व्हिडिओमध्ये श्री श्री रविशंकरांनी डाएट आणि न्यूट्रिशनबाबत फिटनेससाठीच्या काही टिप्स सांगितल्या आहेत. ते म्हणतात मुलांना न्यूट्रिशनबाबत माहिती असायला हवे. मुलांना शरीरात प्रोटीन, कार्ब्स आणि इतर न्यूट्रिशनची गरज का आणि कशासाठी असते हे माहिती असणे गरजेचे आहे.

श्री श्री रविशंकरांनी आजीच्या काळातील काही उपाय सांगितले आहेत

श्री श्री रवि शंकर यांच्या आजीच्या जेवणात पालक कायम असायची. प्रत्येक दिवसाच्या त्यांच्या जेवणात विविध पालेभाज्यांचा समावेश असायचा. एकादशीचे व्रत असल्यास कडू चवीच्या हिरव्या भाज्या जसे की कारले आणि इतर पौष्टिक भाज्या त्यांची आजी खायची. तसेच त्यांच्या आजीच्या दैनंदिन जेवणात दही, सलाड आणि दाळींचा समावेश असायचा.

Shri Shri Ravi Shankar Health Tips
Curry Leaves Benefits पाण्यात कढीपत्ता उकळून प्यायल्यास मिळतील अगणित लाभ, जाणून कसे तयार करायचे पाणी

केळीच्या पानांत जेवण

श्री श्री रवि शंकरांनी केळीच्या पानांत जेवण जेवण्याचे बरेच फायदे सांगितले आहेत. या पानांत जेवणे डोळ्यांसाठी फार फायद्याचे असते. केळीच्या पानांवर जेवण वाढण्याची एक पद्धत असते. ज्यात उजव्या हाताच्या बाजूला मीठ ठेवले जाते. त्यानंतर सलाड आणि अनेक सीजनल भाज्या ठेवल्या जातात. संपूर्ण मीलमध्ये १२-१३ खाद्यपदार्थांचा समावेश असतो. ज्यामुळे तुमचे जेवण बॅलेंस्ड असते.

Shri Shri Ravi Shankar Health Tips
Healthy lifestyle: आहारामध्ये करा हे बदल, आजारांपासून सुटका मिळवा अन् घ्या निरोगी जीवनाचा आनंद

डाएट कसा असावा?

श्री श्री रवि शंकरांच्या मते, जेवणात पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश असावा. असा डाएट घ्यावा ज्यात व्हेजिटेरियन, पौष्टिक आणि पचण्यास हलके पदार्थ असावेत. मध, आले, बदाम, सीड्स आणि ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन नक्की करावे. (Lifestyle)

या गोष्टी टाळा

श्री श्री रवि शंकर सांगतात की, शिळं अन्न, खूप जास्त तेल, मसाले आणि साखर असलेले पदार्थ खाऊ नये. नॉन व्हेजिटेरियन फूड, खूप जास्त लसूण, कांदा खाणे टाळावे. या गोष्टी थकवा वाढवतात. शिवाय त्यांनी प्रोसेस्ड आणि फ्रोजन व कॅन फूड टाळण्यासही सांगितले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()