Shriram Nene Health Tips About ABCG Juice : ज्यूस मधून अनेक फायदे होत असून त्यामुळे तुमचं मोटॅबोलिझम सशक्त होत असल्याने तुमची रोजची पोषण तत्वांची गरज भागवली जाते, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. व्हेन आणि कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांचं हे सर्वात आवडतं ड्रींक असल्याचं नुकतच सांगितलं.
काय आहे ABCG ज्यूस?
याचं उत्तर डॉ. नेने यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिलं आहे. ते म्हणतात रविवारच्या सकाळची सुरूवात करण्यासाठी या ABCG ज्यूस सारखं दुसरं काय असू शकतं? ABCG म्हणजे अॅप्पल(सफरचंद), बीटरूट, कॅरोट (गाजर) आणि जिंजर (आलं). यात आपण सर्वाधिक व्हिटॅमिन्स कव्हर करतो असं वाटतं. हा ज्युस म्हणजे एक पॉवरफूल कॉम्बीनेशन आहे ज्यामुळे आपली स्कीन ग्लो करते आणि शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
यात झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी६, सी, मिनरल्स असे अनेक पोषक तत्वे मिळतात. त्यामुळे शरीर डीटॉक्स होत असल्यानं उपाशी पोटी घेणं उत्तम ठरतं. शिवाय यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. बीपी, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं. शिवाय याचे अँटी एजिंग इफेक्ट्स पण आहेत.
हा ज्यूस कसा बनवावा?
साहित्य
बीट - ३०० ग्रॅम
गाजर - ३०० ग्रॅम
सफरचंद - १०० ग्रॅम
आलं / अद्रक - अर्धा इंच
लिंबूचा रस - अर्धा चमचा
चवीनुसार मीठ
कृती
बीट, गाजर, सफरचंद, आलं सगळ्याचा एकत्र ज्यूस करा. नंतर नीट गाळून घ्या. त्यात लिंबाचा रस आणि मीठ घाला. नीट हलवून सर्व्ह करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.