Mouth Ulcers : तोंड येण्याच्या समस्येने त्रस्त आहात? हे ६ पदार्थ लगेच खाण्यातून वगळा

बर्‍याच प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की तोंडात येणारे फोड कोणत्याही उपचाराशिवाय आपोआपच बरे होतात
Mouth Ulcers
Mouth Ulcersesakal
Updated on

Mouth Ulcers : हल्ली अनेकजण तोंड येण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. तोंडात आलेले फोड हे सहसा आकाराने लहान असतात आणि तोंडाच्या आत, ओठांवर किंवा तोंडाच्या बाजूला ते येतात. यात वेदना, खाण्यापिण्यात त्रास आणि अस्वस्थता जाणवते. फोडाभोवती लालसरपणा, सूज आणि त्यामुळे तुम्हाला चिडचिड होऊ शकते.

बर्‍याच प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की तोंडात येणारे फोड कोणत्याही उपचाराशिवाय आपोआपच बरे होतात. पण कधी कधी तुमच्या खाण्याच्या सवयीमुळे ते खूप वाढतात किंवा ते बरे होण्याची प्रक्रिया मंदावते. आज आम्ही तुम्हाला असे पदार्थ सांगणार आहोत जे तोंड आले असल्यास खाणे टाळावे.

मसालेदार पदार्ख खाणे टाळा

जर तुमच्या तोंडातील फोड अगदीच उघडे पडले असतील तर मसालेदार अन्न फोडांचा त्रास आणखी वाढवू शकतात. हे एखाद्या व्यक्तीसाठी अत्यंत वेदनादायक असू शकते. लाल मिरच्या, मसालेदार गरम चटण्या आणि जड मसाल्यांच्या पदार्थांपासून शक्यतो दूर रहा. हे पदार्थ खाण्यातून वगळा.

कॅफिनयुक्त कॉफी किंवा टी

तुम्ही कॉफी प्रेमी असाल तर तुम्हाला फोडांचा त्रास असल्यास जास्त कॉफी पिणे टाळायला हवे. कॉफीच्या सेवनाने तुमच्या शरीरातील उष्णता आणखी वाढू शकते. कॉफीमध्ये सॅलिसिलेट्सचे प्रमाण जास्त असल्याने ते तुमच्या हिरड्या आणि जीभेला त्रास देऊ शकते. तुम्हाला कॉफीचे व्यसन असल्यास, कॉफीचे मर्यादित सेवन तुम्ही करायला हवे.

अल्कोहोलचे सेवन

अल्कोहोलच्या अतिसेवनाने केवळ आरोग्यावरच वाईट परिणाम होत नाही तर तोंड कोरडे होते आणि सेफ्टी लेयरचा थरदेखील डॅमेज होतो. यामुळे फोड बरे होण्याची प्रक्रिया मंदावते, तसेच वेदना आणि सूज येऊ शकते. म्हणूनच, तोंडाचे व्रण लवकर बरे होण्यासाठी अल्कोहोलचे प्रमाण टाळा.

कार्बोनेटेड ड्रिंक

जर तुम्ही सोडा ड्रिंक्स पिण्याचे शौकीन असाल तर ते तोंडातील अल्सर मोठ्या प्रमाणात वाढवू शकते. कार्बोनेटेड पेयांमध्ये आम्ल असते, जे तुमच्या तोंडाच्या मऊ भागास नुकसान पोहोचवू शकते आणि अल्सर होऊ शकतात. याव्यतिरिक्त, त्यात मोठ्या प्रमाणात साखर देखील असते, जी सूक्ष्मजंतूंच्या वाढीस प्रोत्साहन देते, ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो.

Mouth Ulcers
Mouth Ulcers: वारंवार तोंड येण्याच्या समस्येने तुम्ही देखील त्रस्त आहात, पान खाल्ल्याने सुटतील तोंडाच्या सर्व समस्या

आंबट फळे

आंबट फळांमध्ये सायट्रिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते, जे तोंडात अल्सर होण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. सायट्रस फळे आणि भाज्या, विशेषत: संत्री, लिंबू, द्राक्षे यांत सायट्रिक अॅसिड असते. या फळांमुळे तुमच्या तोंडाच्या अल्सरला तीव्र त्रास होऊ शकतो. (Fruits)

Mouth Ulcers
Mouth Ulcers: सारखं तोंड येतंय मग ‘हे’ घरगुती उपाय करून पहा

अतिगरम किंवा अतिथंड खाणे

तोंडाच्या अल्सरसाठी खूप गरम अन्न किंवा खूप थंड अन्न योग्य नाही, कारण या काळात तोंडाचे व्रण खूप नाजूक असतात. अन्न नेहमी किंचित गरम असावे, जेणेकरून अल्सर होणार नाही. आईस्क्रीम, कुल्फी, खूप गरम सूप इत्यादी पदार्थ टाळा. तोंडाचे व्रण बरे झाले की तुम्ही ते खाऊ शकता. (Mouth Ulcer)

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.