वेदना घेऊन जगताहेत सिकलसेलबाधित रुग्ण

मेडिकलमध्ये हायड्रॉक्सी युरिया कॅप्सूलचा तुटवडा
Sickle cell disease patients
Sickle cell disease patients
Updated on

नागपूर - राज्यात सर्वाधिक सिकलसेलबाधित विदर्भात आहेत. मात्र, शासनातर्फे निधी उपलब्ध करून दिला जात नाही. यामुळे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (मेडिकल) महिनाभरापासून सिकलसेलबाधितांना आवश्यक हायड्रॉक्सी युरिया कॅप्सूल उपलब्ध नाही. एक दिवस ही कॅप्सूल न घेतल्यास सिकलसेलबाधितांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. महिनाभरापासून मेडिकलमध्ये सिकलसेलबाधित औषधांसाठी चकरा मारत असून कॅप्सूल नसल्यामुळे संतप्त झालेले सिकलसेलबाधित आल्या पावली परत जात आहेत.

मेडिकलमध्ये दर दिवसाला २० सिकसलेलबाधित औषधासाठी येतात. विशेष असे की, सिकलेसलचा राष्ट्रीय कल्याण कार्यक्रमात समावेश आहे. यानंतरही रुग्णांना औषध उपलब्ध होत नाही. सिकलसेलबाधित सर्वाधिक बीपीएलच्या यादीत येतात. बीपीएलग्रस्तांना मोफत औषध उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. मात्र, यानंतरही मेडिकलमधील डॉक्टरांकडून सिकलसेलबाधितांना हायड्रॉक्सी युरिया कॅप्सूलसाठी बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. वेदनाशामक हायड्रॉक्सी युरिया कॅप्सूल उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सिकलसेल सोसायटीच्या जया संपत रामटेके यांनी केली आहे.

वेदना सहन करीन जी...

पुसद येथील अजय कुमरे हा २८ वर्षीय सिकलसेलबाधित मेडिकलमध्ये आला. तपासणीनंतर त्यांच्या हाती चिठ्ठी दिली. औषधालयात औषध वितरण विभागाकडून हायड्रॉक्सी युरिया कॅप्सूल नसल्याचे सांगण्यात आले. या औषधाची किंमत २१० रुपये आहे. गरिबांना मेडिकलमध्ये मोफत मिळते. महिनाभरापासून साठा नसल्याने मिळाले नाही. पैसे नसल्याने अजयने कॅप्सूल घेतले नाही. त्याच्याशी संवाद साधला असता, पैसेच नसल्याने कसे घेऊ औषधं? वेदना सहन करीन जी..अशी प्रतिक्रिया नोंदवली.

सात वेळा आलो...

नागपूरचे रहिवासी विनोद मून सिकसेलबाधित आहेत. गेल्या महिनाभरात सात फेऱ्या मेडिकलमध्ये मारल्या पण औषध नसल्याचे सांगण्यात येते. हायड्रॉक्सी युरिया कॅप्सूलची किंमत जास्त आहे. विकत घेऊ शकत नाही. पैसे नसल्यामुळे मेडिकलमध्ये पायी येतो. कुठून औषध घेणार? तुम्हीच सांगा!

हायड्रॉक्सी युरिया कॅप्सूल सिकलसेल रुग्णांसाठी वेदनाशामक म्हणून काम करते. असह्य वेदनांपासून मुक्ती मिळते. आयुष्यभर कॅप्सूल घ्यावी लागते. एक दिवस न घेतल्यास दुसऱ्या दिवशीच वेदना सुरू होतात. वयोमानानुसार १ ते २ कॅप्सूल रोज घ्यावे लागतात. महिनाभरापासून येथे कॅप्सूल उपलब्ध न झाल्याने गरीब सिकलसेलबाधित महिनाभरापासून मेडिकलमध्ये खेटा मारत आहे. मेडिकल प्रशासनाने लोकल पर्चेस करून हायड्रॉक्सी युरिया कॅप्सूल उपलब्ध करून द्यावे.

-जया संपत रामटेके, अध्यक्ष, सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.