Aluminium Foil Side Effects: सतत अ‍ॅल्युमिनियम फॉईल वापरण्याची सवय बनवेल तुम्हाला ‘विसराळू’; हे पर्याय वापरा

अॅल्युमिनियम फॉईलचे 5 पर्याय कोणते? त्याचा फायदा होईल का
Side Effects Of Aluminium Foil
Side Effects Of Aluminium Foilesakal
Updated on

Side Effects Of Aluminium Foil: पदार्थ पॅकींग करून देणे सोपे पडावे यासाठी प्रत्येक घरात अॅल्युमिनियम फॉईल पेपर वापरले जातात. फॉईल पेपर वापरणे, खरेदी करणे सोपे आणि परवडणारे असल्याने त्याचा वापर वाढतच चालला आहे. पण, असे करणे तुम्हाला एका मोठ्या आजाराच्या हवाली करू शकते.

 बहुतेक स्वयंपाकघरांमध्ये अॅल्युमिनियम फॉईल पेपर असतो. अन्न गरम ठेवण्यापासून ते बेकिंगपर्यंत याचा वापर केला जाऊ शकतो. परंतु हा पेपर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो आणि आपल्याला अल्झायमर देऊ शकतो.

Side Effects Of Aluminium Foil
Kitchen Hacks : घरात झालाय मुंग्याचा सुळसुळाट? हे उपाय करा मुंग्या स्वत:च घर सोडून जातील!

अॅल्युमिनियम फॉईल पेपरचे दुष्परिणाम

काही संशोधनात अल्झायमरच्या रुग्णांमध्ये अॅल्युमिनियमचे प्रमाण दिसून आले आहे. या आजारात स्मरणशक्ती कमकुवत होते आणि आपण विसरायला लागतो. यामुळे तुमची मेंदूची शक्तीही कमकुवत होते.

न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी अॅल्युमिनियम फॉईलचे 5 पर्याय सांगितले आहेत. जे आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित ठरू शकते. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.

  • बटर पेपर

  • पार्चमेंच पेपर

  • बीसवॅक्स रॅप

  • कॉटन आणि लिनन नॅपकिन

  • मलमलचे कापड

  • केळीची पाने

 काही संशोधनात असे दिसून आले आहे की अॅल्युमिनियम फॉइल वापरल्याने अन्नात अॅल्युमिनियमचे प्रमाण वाढू शकते. हे शरीरात अधिक देखील असू शकते. हे अगदी दुर्मिळ आहे, कारण ते अन्नात खूप कमी प्रमाणात आढळते.

का आहे धोकादायक

एका संशोधनानुसार, आपण स्वयंपाक किंवा पॅकिंगसाठी अ‍ॅल्युमिनियम फॉइल वापरतो तेव्हा काही अ‍ॅल्युमिनियमचे कण खाद्यपदार्थमध्ये जातात. विशेषतः जेव्हा आपण खूप गरम खाद्यपदार्थ पॅक करतो किंवा त्यात व्हिटॅमिन सी समृद्ध खाद्यपदार्थ गुंडाळतो.

तेव्हा अ‍ॅल्युमिनियमची रीअ‍ॅक्शन होऊ शकते आणि ऑक्सिडाइज होऊ शकतात. अशा परिस्थितीत जे लोक रोज फॉइल वापरतात त्यांच्या शरीरात अ‍ॅल्युमिनियम तत्वाचे प्रमाण वाढते आणि यामुळे मज्जासंस्था, मेंदू आणि हाडांचे आजार होऊ शकतात.

लोक रोज फॉइल वापरतात त्यांच्या शरीरात अ‍ॅल्युमिनियम तत्वाचे प्रमाण वाढते
लोक रोज फॉइल वापरतात त्यांच्या शरीरात अ‍ॅल्युमिनियम तत्वाचे प्रमाण वाढतेesakal
Side Effects Of Aluminium Foil
Kitchen Astro Tips : स्वयंपाक घरातल्या तव्याचे हे छोटेसे उपाय करतील घरातले सगळे तणाव दूर...

अॅल्युमिनियम असलेल्या कोणत्या गोष्टी आहेत?

फळे, भाज्या, मांस, मासे, तृणधान्ये आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये अॅल्युमिनियमचे प्रमाण असते. त्याचबरोबर चहापत्ती, मशरूम, पालक आणि मुळा खाल्ल्याने शरीर ते वेगाने शोषून घेऊ लागते.

हे पुरेसे अॅल्युमिनियम आहे

डब्ल्यूएचओच्या मते, कोणत्याही संशयास्पद आरोग्यसमस्या टाळण्यासाठी आपण अॅल्युमिनियम मर्यादित केले पाहिजे. एका आठवड्याच्या आत, एखाद्या व्यक्तीने त्याच्या वजनानुसार प्रति 1 किलो 2 मिलीग्रामपेक्षा कमी अॅल्युमिनियम चे सेवन केले पाहिजे.

अॅल्युमिनियम कमी कसे करावे

  • अॅल्युमिनियम कमी करण्याचे मार्ग

  • मंद आचेवर अन्न शिजवावे.

  • अॅल्युमिनियम फॉइलचा वापर कमी करा

  • अॅल्युमिनियमची भांडी वापरणे बंद करा

  • अॅल्युमिनियम फॉइल आणि अम्लीय अन्न मिसळू नका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.