Health Care News : जाडजूड मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी 'हे' व्यायाम नक्की करा, पाय दिसतील सुंदर...

आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत. ज्यामुळे तुमची मांडीवरची चरबी कमी होण्यास मदत होईल.
Health Care News
Health Care Newssakal
Updated on

वाढलेले वजन कमी करण्यासाठी जवळपास प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे. वजन कमी करण्यासाठी दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. एक म्हणजे आहार आणि दुसरे म्हणजे व्यायाम या दोन्ही गोष्टी काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. आपल्या शरीरावर सर्वात जास्त चरबी पोट आणि मांडी तयार होते.

आपल्या मांड्यांवरची चरबी लोंबकळत असेल तर शरीराचे सौंदर्य खराब दिसते. चालताना, हालचाल करताना मांड्यांच्या चरबीचीही हालचाल होते ज्यामुळे आपल्या मांड्यांकडे लोकांचे लक्ष वेधले जाते. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत. ज्यामुळे तुमची मांडीवरची चरबी कमी होण्यास मदत होईल.

1. सुमो स्क्वॅट्स

हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहा. दोन्ही पाय एकमेकांपासून दूर करा.

आता पाठीचा कणा ताठ ठेवत पाय गुडघ्यातून वाकवा आणि हाताची बोटे जमिनीला टेकेपर्यंत खाली वाका.

एखादी खाली पडलेली वस्तू उचलण्यासाठी वाकतो, त्याप्रमाणे वाकायचे नाही. नजर आणि चेहरा सरळ ठेवत खाली वाकायचे आहे. या अवस्थेत 5 ते 10 सेकंद राहण्याचा प्रयत्न करा. पुन्हा आधीच्या पोझिशनला या. अशा पद्धतीने 12 ते 15 वेळा व्यायाम करावा.

Health Care News
Health Care Tips : पावसाळ्यात आळस दूर करण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो; दिवसभर रहाल फ्रेश...

2. फॉरवर्ड लंजेस

हा व्यायाम करण्यासाठी ताठ उभे रहा. दोन्ही हात कंबरेवर ठेवा. आता एक पाय साधारण एखादा फुट पुढे घ्या. आता हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा.

जोपर्यंत मागच्या पायाचा गुडघा जमिनीला टेकत नाही तोपर्यंत खाली वाका. यानंतर या अवस्थेत 5 ते 10 सेकंद राहण्याचा प्रयत्न करा.

एकूण 10 ते 12 वेळा ही क्रिया पुन्हा पुन्हा करा. यानंतर दुसऱ्या पायाने पुन्हा अशाच पद्धतीने व्यायाम करावा.

3. जंपिंग जॅक्स

हा एक छान व्यायाम आहे. लहानपणी बऱ्याच जणांनी हा व्यायाम केलेला असतोच, तोच आता पुन्हा करायचा आहे.

या प्रकारामुळे संपूर्ण शरीराचा खूप उत्तम प्रकारे व्यायाम होतो. जंपिंग जॅक्स करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहा. यानंतर उडी मारत दोन्ही पायातले अंतर वाढवा आणि त्याचवेळी दोन्ही हात डोक्यावर नेऊन टाळी वाजवा.

दुसऱ्या स्टेपमध्ये पुन्हा उडी मारत दोन्ही पाय जवळ आणा आणि दोन्ही हात खाली घ्या.

जलद पद्धतीने उड्या मारत 10 ते 15 वेळा हा व्यायाम करावा.

Shabda kode:

Related Stories

No stories found.