Summer Skincare: उन्हाळ्याच पारा दिवसेंदिवस वर चढत चालला आहे. याचा परिणाम आपल्या त्वचेवरही होत आहे. उन्हामुळे सनबर्न, त्वचा ड्राय होणं, तसचं त्वचा लाल होणं आणि जळजळ अशा अनेक समस्या निर्माण होतात.
त्वचेच्या चिंतेमुळे उन्हात पाऊल ठाकणंही अनेकांना कठिण होतं. Skin Care Marathi Tips Multani mitti soil beneficial in summer
त्यात उन्हामुळे घाम तसचं चिकटपणामुळे पिंपल्स आणि मुरुम येण्याच्या तसचं चेहरा काळवंडण्याच्या समस्यांनाही तोंड द्यावं लागतं. त्यामुळे या काळात त्वचेची Skin विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
यासाठी भारतामध्ये हजारो वर्षांपासून औषधी Medicinal उपयोगासाठी महत्वाची असलेली मुलतानी माती Multani Soil तुमच्या त्वचेचं संरक्षण करु शकते.
उन्हाळ्यात चेहऱ्याला लावण्यासाठी विविध क्रिम किंवा सिरम येत असतील. मात्र जर तुम्हाला घरच्या घरी आणि स्वस्तामध्ये त्वचेची काळजी घ्यायची असेल तर मुलतानी माती हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. मुलतानी माती लावल्याने तुमच्या चेहऱ्याला थंडावा देखील मिळेल.
तसचं यातील हायड्रेटिंग गुणधर्मांमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. तसचं तुमची त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि त्वचेला पोषण देण्यासाठी मदत करते. यातील सक्रिय घटक अतिरिक्त तेल, घाण, घाम आणि अशुद्धता शोषून घेतात आणि त्वचा स्वच्छ, मऊ आणि कोमल राहते.
मुलतानी मातीचे फायदे
मुलतानी माती ही खास करून मुरुम आणि त्वचेवरील पुटकुळ्यांची समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहे.
मुलतानी माती त्वचेवरील सीबम आणि तेल काढून टाकण्यास मदत करते. घाण, घाम आणि अशुद्धता काढून टाकून त्वचेला खोलवर शुद्ध करते. तसचं त्वचेचा टोन सुधारून त्वचा चमकदार बनवते. multani mitti in summer
ही माती सनबर्न, त्वचेवरील पुरळ आणि इतर एलर्जीवरील उपायांसाठी देखील प्रभावीपणे काम करते.
मुलतानी मातीमुळे उन्हाळ्यात त्वचेवर आलेला लालसरपणा कमी होण्यास मदत होते आणि त्वचेला थंडावा मिळतो. तसचं टॅनिंग कमी होण्यासही मदत होते.
हे देखिल वाचा-
तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती गुणकारी
तेलकट त्वचा असलेल्यांना उन्हाळ्यात मुरुम किंवा पुटकुळ्या येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. यासाठीच मुलतानी माती हा एक गुणकारी पर्याय आहे. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त सीबम स्राव शुद्ध करण्यासाठी तसचं बाहेर काढण्यासाठी मदत होते.
त्यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेलकटपणा कमी होवून ऍक्नेची समस्या दूर होते. ऍक्ने तसचं मुरुमांपासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी मुलतानी मातीची पावडर पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला तसचं मानेला सर्वत्र समान लावा.
१५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून किमान दोन वेळा मुलातानी मातीचा फेसपॅक लावल्यास ऍक्नेची समस्या दूर होईल. Multani mitti for oily skin
चेहऱ्याला थंडावा मिळण्यासाठी मुलतानी माती उपयोगी
उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी मुलतानी मातीचा वापर फायदेशीर ठरतो. तसचं चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. यासाठी दोन चमचे मुलतानी मातीमध्ये एक चमचा दही आणि अर्धा चमचा गुलबाजल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून चेहरा १५ मिनिटांनी चेहरा धुवा.
हायड्रेशन वाढवण्यास मदत
चेहऱ्यावरील त्वचेचं हायड्रेशन वाढवण्यासाठी मुलतानी मातीचा वापर उपयुक्त ठरू शकतो. यामुळे चेहऱ्यावरील कोलेजन बूस्ट होण्यास मदत होते. तसंच त्वचेचे पोर्स आतून डिटॉक्स करण्यास मदत होते.
ज्यांची त्वचा कोरडी आणि रुक्क्ष आहे तसचं ज्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत. त्यांच्यासाठी देखील मुलतानी माती उपयुक्त आहे. मुलतानी मातीमध्ये काही थेंब लिंबाच्या रसाचे मिसळून चेहऱ्याला लावल्यास त्वचा तरुण दिसण्यास मदत होते. Multani mitti summer face pack
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.