Sleep With Overhead Blancket : देशभरात थंडी वाढत आहे. थंडीत उब मिळावी म्हणून लोक ब्लँकेट, स्वेटर वापरतात. तुम्ही बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की, लोक थंडीत उब मिळावी म्हणून तोंडावर पांघरून झोपतात. तर काही लोक स्वतःला एवढे गुंडाळून घेतात की, बाहेरची हवाच आत येऊ नये आणि शरीर उबदार रहावं.
हार्टअॅकचा मोठा धोका
या सवयी आरोग्यासाठी फारच धोकादायक आहेत. यामुळे हार्टअॅक येण्याचा मोठा धोका असतो. तोंड आणि शरीराला पुर्ण झाकल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. अशात अस्थमा किंवा श्वसनाची समस्या असणाऱ्या लोकांसाठी हे धोकादायक आहे. यामुळे हार्टअॅक पण होऊ शकतो.
मानसिक आजारांची शक्याता
पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्याने आणि ओव्हरहिटींगमुळे डोकेदूखी, झोप न येणे, मळमळणे, थकवा असे त्रास सुरू होतात. काही संशोधनांमध्ये हे समोर आलं आहे की, यामुळे मानसिक आजार होऊ शकतात. यामुळे अल्जाइमर (विसराळूपणा) किंवा डिमेंशियासारखे आजार होऊ शकतात.
वाढू शकतं वजन
ज्यांना स्लीप एप्नियाची समस्या आहे, त्यांना श्वास घेणं कठीण होतं. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि वजन वाढतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.