Smart Bandage : आता डॉक्टर इन पॉकेट ; घरबसल्या घेऊ शकणार ट्रीटमेंट, जाणून घ्या स्मार्टबँडेजची कमाल

Smart Bandage Technology : सेन्सर जखमेची स्थिती करतील मॉनिटर
Smart Bandages Remote Wound Care
Smart Bandages Remote Wound Careesakal
Updated on

Health Tech : आजच्या जगात तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढत आहे आणि वैद्यकीय क्षेत्रातही याचा मोठा प्रभाव पडत आहे. स्मार्ट बँडेज हे तंत्रज्ञानाचा एक अलिकडचा सुधारित नमुना आहे. ज्यामुळे डॉक्टरांना घरी बसूनही रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा मिळते.

Caltech येथे विकसित केलेली स्मार्ट-बँडेज लवचिक पॉलिमरपासून बनलेली आहे ज्यामध्ये एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स आणि औषध आहे. हे इलेक्ट्रॉनिक्स सेन्सर्सना यूरिक ऍसिड किंवा लॅक्टेट सारख्या रेणूंवर आणि जखमेतील pH पातळी किंवा तापमान यांसारख्या परिस्थितींवर लक्ष ठेवण्याची सुविधा देईल, ज्यामुळे जळजळ किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग सूचित होऊ शकतो. या प्रकारची मलमपट्टी मधुमेहाच्या अल्सरसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

Smart Bandages Remote Wound Care
Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

स्मार्ट बँडेज म्हणजे काय?

स्मार्ट बँडेज हे पारंपारिक पट्टीपेक्षा अधिक कार्यक्षम असतात. यात अनेक सेन्सर असतात जे जखमेची स्थिती सतत मॉनिटर करतात आणि डॉक्टरांना त्वरित माहिती देतात. यात खालील गोष्टींचा समावेश असू शकतो ज्यामध्ये जखमेची तापमान पातळी मोजते.जखमेतील आर्द्रताचे प्रमाण मोजते. जखमेतील pH पातळी मोजते.जखमेवर किती ताण येतो हे मोजते.

स्मार्ट बँडेज कसे काम करते?

स्मार्ट बँडेज जखमेवर लावले जाते आणि ते डेटा गोळा करण्यास सुरुवात करते. हा डेटा वायरलेस द्वारे डॉक्टरांच्या स्मार्टफोन किंवा संगणकावर पाठवला जातो. डॉक्टर जखमेची स्थिती लक्षात ठेवू शकतात आणि आवश्यकतेनुसार उपचारांमध्ये बदल करू शकतात.

Smart Bandages Remote Wound Care
Parents Bonding with Child : आजच्या काळात पालकत्वाची शैली आणि सकारात्मक पालकत्व खूप महत्वाचे ; डॉ. मलिहा साबळे

स्मार्ट बँडेजचे फायदे

  • डॉक्टर रुग्णाला भेटल्याशिवाय जखमेची स्थिती मॉनिटर करू शकतात.

  • जखमेतील कोणत्याही बदलांचा डॉक्टरांना त्वरित अंदाज येतो आणि त्यानुसार उपचार केले जातात.

  • डॉक्टर जखमेची स्थिती लक्षात घेऊन योग्य उपचार देऊ शकतात.

  • जखमेची काळजी घेण्यास मदत करते आणि संक्रमण होण्याची शक्यता कमी करते.

  • रुग्णांसाठी सोयीस्कर असून रुग्णांना वारंवार डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही.

Smart Bandages Remote Wound Care
AI Teacher : या AI शिक्षिकेने जिंकलं विद्यार्थ्यांचं मन ; निती आयोगाचा प्रकल्प आसाममध्ये लाँच

स्मार्ट बँडेजचे तोटे

पारंपारिक बँडेजपेक्षा स्मार्ट बँडेज अधिक महाग असतात.

डेटा सुरक्षितपणे साठवणे आणि हॅकिंगपासून संरक्षण करणे आवश्यक आहे.

तथापि, स्मार्ट बँडेजचे फायदे तोट्यांपेक्षा किती तरी पटीने जास्त आहेत. भविष्यात, स्मार्ट बँडेज अधिक प्रगत होतील आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल घडवून आणतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.