Mobile Phone Addiction: तुमचं मूल ३ तासांपेक्षा जास्त वेळ Mobile वापरतंय तर वेळीच व्हा सावध...अन्यथा जडतील हे आजार

स्मार्टफोनने Smart Phone आपल्या जीवनात एवढा प्रवेश केलाय की आता अवघ्या काही महिन्यांच्या मुलालादेखील आई-वडिल मोबाईल दाखवून शांत करू लागले आहेत. वर्ष दीड वर्षांची मुलंही मोबाईलविना जेवत नाहीत
Mobile Phone Addiction
Mobile Phone AddictionEsakal
Updated on

Mobile Phone Addiction: आजच्या घडीला मोबाईल फोन Mobile Phone नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. मोबाईल, टॅब अशा गॅजटस् ची बाजारात सध्या मोठी मागणी आहे. स्मार्टफोन्सलाठी भारत ही प्रमुख बाजारपेठ आहे.

दिवसेंदिवस स्मार्टफोनचा Smart Phone वापर वाढतं चालला आहे. आता तर मुलाच्या अभ्यासासाठी देखील स्मार्टफोन आणि टॅबची Tab गरज भासू लागली आहे.

ऑनलाईन क्लासेसमुळे शालेय मुलांच्या हातातही मोबाईल आले. मात्र हेच मोबाईल आता लहान  मुलांच्या आरोग्यासाठी तोट्याचे ठरत आहेत. smartphone over usage over Three hours a day in teens may cause back pain

स्मार्टफोनने Smart Phone आपल्या जीवनात एवढा प्रवेश केलाय की आता अवघ्या काही महिन्यांच्या मुलालादेखील आई-वडिल मोबाईल दाखवून शांत करू लागले आहेत. वर्ष दीड वर्षांची मुलंही मोबाईलविना जेवत नाहीत.

तर पालकही वेळ वाचवण्यासाठी आणि मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल Mobile फोन देत आहेत. मात्र या मोबाईलमुळे या लहानग्यांचं भविष्य आणि त्याचं आरोग्य धोक्यात येऊ लागलं आहे.

मोबाईलच्या अति वापरामुले मुलांना कंबरदुखी आणि दृष्टीसंबधी समस्या निर्माण होत असल्याचं एका नव्या संशोधनात समोर आलं आहे. 

FAPESP द्वारा वित्तप्रात्प आणि वैज्ञानिक पत्रिका हेल्थकेअरमध्ये एक लेख प्रकाशित करण्यात आला आहे. ब्राझीलमधील काही संशोधकांनी पाठीच्या कण्यातील समस्या होण्यामागच्या कारणांवर एक शोध लावला आहे.

या संशोधनात असं दिसून आलंय की कोणत्याही प्रकारची स्क्रीन ज्या मोबाईल किंवा टॅब दिवसातून ३ तासांपेक्षा जास्त वेळ पाहणं, स्क्रीन खूप जवळून पाहणं आणि पोटावर झोपणं किंवा दीर्घकाळ बसणं ही पाठदुखी आणि मणक्याच्या समस्यांची मुख्य कारणं आहेत. म्हणजेच मणक्याशी संबंधीत कोणत्याही समस्यांची ही मुख्य कारणं आहेत.

हा अभ्यास थोरॅसिक स्पाइन पेन (TSP)वर केंद्रित होता. थोरॅसिक हे छातीच्या मागच्या बाजुला असतं. खांद्यांपासून खाली कमरेपर्यंत ते पसरलेलं असतं. या शोधासाठी १४ ते १८ या वयोगटातील मुलं आणि मुलींना सहभागी करुन घेण्यात आलं होतं.

यात एकूण १,६२८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होतं. यात थोरॅसिक स्पाइन पेन म्हणजेच मणक्याच्या या वेदना मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. 

हे देखिल वाचा-

Mobile Phone Addiction
Mobile In Toilet : तुम्हीही टॉयलेटमधे मोबाईल वापरता का? त्याचे गंभीर परिणाम वाचून उडेल झोप

थोरॅसिक स्पाइन पेन वाढण्याची कारणं

टीएपी म्हणजेच अप्पर बॅक पेनचा हा प्रकार विविध वयोगटातील व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतोय. या आजाराचा त्रास असलेल्यांमध्ये १५-३५ टक्के लोक हे वयस्कर असून  १३-३५ टक्के लहान मुलांमध्ये हा त्रास दिसून येतोय.

कोरोनाकाळामध्ये मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे ही समस्या अजून वाढली आहे.  तर शालेय मुलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात आढळून आली आहे. शालेय मुलं त्यांचा अधिकतर वेळ गॅजेट्समध्ये घालवत असल्याने हा त्रास वाढू लागला आहे. 

मोबाईलचे दुष्परिणाम आणि पालकांनी कोणती काळजी घ्यावी

१.एका संशोधनानुसार १२ ते १८ महिन्यांच्या मुलांमध्ये स्मार्ट फोनचा वापर जास्त असल्याचं निदर्शनास आलं आहे. या मुलांना मोबाईल अगदी जवळून दाखवण्यात येत असल्याने डोळ्यांवर याचा विपरीत परिणाम होतो.

२. थेट डोळ्यांवर प्रबाव पडत असल्याने लवकर चष्मा लागणे, डोळ्यांची जळजळ आणि डोळे कोरडे होणे अशा समस्या निर्माण होतात.

३. स्मार्टफोनच्या वापरामुळे डोळ्यांच्या पापण्या कमी वेळा मिटल्या जातात. यावा कंप्युटर विजन सिंड्रोम म्हणतात. त्यामुळे लहान मुलांना अर्धा तासाहून अधिक वेळ स्क्रीन टाइम होणार नाही याची काळजी घ्यावी.

४. लहान वयातच स्मार्टफोनची सवय लागल्याने मुलांचा सामाजिक पातळीवर विकास होत नाही. तसचं बाहेर आणि इतर खेळ न खेळल्याने त्यांचा व्यक्तीमत्व विकास खुंटतो.

५. जास्त तास गेम खेळल्यामुळे अनेकदा मुलं आक्रमक होतात.

६. इंटरनेटवर जर तुम्हाला काही माहितीपूर्ण व्हिडीओ दाखवायचे असतील तर त्यासाठी एक वेळ निर्धारित करा आणि मुलांसोबत बसून ते पहा. यासाठी शक्य असल्यास मोबाईल एवजी स्मार्टटीव्हीवर व्हिडीओ पाहा. जेणेकरून स्क्रीनमध्ये योग्य अंतर राखल जाईल.

७. फोनमध्ये अधिक वेळ घालवल्याने अनेक मुलं पुरेस जेवणं जेवत नसल्याने पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे इतर आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. 

त्यामुळे आई वडिल आणि कुटुंबातील सर्वच सदस्यांनी एकत्र जबाबदारी घेत लहान मुलांचा स्क्रीन टाइम कमी राहण्यासाठी प्रयत्न करणं गरजें आहे. अन्यथा तात्पुरत्या हट्टासाठी दिलेल्या मोबाईलमुळे भविष्यात त्यांना इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.