Heart Attack Due To Smog: हिवाळ्याचा काळ सुरू झाला असून वर्षाचा शेवट आला की थंडी वाढत जाते. अनेकांना गुलाबी थंडीत धुके बघायला आवडतं. अनेकजण या काळात लाँग विकेंडवरही जातात. मात्र गुलाबी थंडीतील धुके तुमच्यासाठी किती घातक ठरू शकतात तुम्हाला माहिती आहे काय?
जे हृदयरोगी आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी धुके घातक ठरतात. याशिवाय फुफ्फुसांना धुके नुकसान पोहोचवतात. त्यामुळे धुक्यापासून हृदयाच्या रूग्णांनी दुरच राहिलेले बरे. नाहीतर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. धोकादायक धुक्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आज आपण काही उपाय जाणून घेणाक आहोत. (Winter)
Smog हा वायूप्रदूषणाचा एक प्रकार आहे. त्याच्या संपर्कात आल्याने श्वसन आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी सकाळी घरातून बाहेर पडणे बंद करा. यासोबतच मोकळ्या ठिकाणी व्यायाम करणे टाळावे.
तुम्हाला शक्य असल्यास घरात एअर फिल्टर नक्की लावा. याशिवाय बाहेरील हवेत श्वास घेणे टाळावे. बाहेर पडताना मास्क वापरण्याची खात्री करा. घरचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा. त्यामुळे बाहेरची हवा घरात येणार नाही.
हृदयरोगी रूग्णांनी हिवाळ्यात आहाराची विशेष काळजी घ्यावी. ब्रोकोली, कोबी, ब्रुसेल्स, स्प्राउट्स यांसारख्या अँटी-ऑक्सिडंटने युक्त पदार्थांचा दररोज समावेश करा. जर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.