स्मोकिंगमुळे शरीरावर खूप वाईट परिणाम होत असतात त्यामुळे शरीरामध्ये कित्येक समस्या आणि आजार होऊ शकतात. स्मोकिंग करणाऱ्या कित्येक लोकांकडून तुम्ही ऐकले असेल की,'' ते स्मोकिंग करतात पण त्यासोबत आरोग्यासाठी योग्य पोषण आहार घेतात आणि व्यायाम करतात. त्यांच्या या सवयींमुळे निरोगी आरोग्य राखण्यास मदत होते, पण असे आजिबात नाही.'' एक्सपर्टच्या मते, चांगला आहार, आणि व्यायाम कोणत्याही प्रकारे स्मोकिंगमुळे निर्माण होणार धोका कमी करू शकत नाही.''
त्यासाठी स्मोकिंग आणि त्याचे तोट्यांवर संशोधक सतत रिसर्च करतात पण एका संशोधनामध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. संशोधनामध्ये सांगितले आहे की, ''जे लोक स्मोकिंग करतात त्यांना हार्ट अॅटकचा धोका कमी असतो पण, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हार्ट संबधी आजारांपासून वाचण्यासाठी स्मोकिंग सुरू केले पाहिजे.''
संशोधनामध्ये काय दावा केला आहे हे आधी व्यवस्थित जाणून घ्या
हा अभ्यास इरबिडमध्ये जॉर्डन यूनिवर्सिटी ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीच्या रिसर्चर्सद्वारे केले आहे आणि एक्सपेरिमेंटल बायोलॉजी जर्नलमध्ये पब्लिश झाले आहे. या संशोधनामध्ये को-राईटर सईद खतीब यांनी सांगितले की, या संशोधनाचा उद्देश स्मोकिंग करणाऱ्या, स्मोकिंग न करणाऱ्या, हाय ब्लड प्रेशर आणि कमी ब्लड प्रेशरचे A1AT च्या प्लाझ्मा पातळीची तुलना करणे होता. या संशोधनामध्ये 29 पुरुष आणि 11 महिलां आणि धूम्रपान करणाऱ्या आणि गैर धुम्रपान करणाऱ्या 4 ग्रुपमध्ये विभाजित केले आहे. त्यानंतर 1, 4, 24, 48 आणि 96 तासांमध्ये त्यांच्या ब्लड सॅम्पल घेतले गेले.
अल्फा-१ अँटी-ट्रिप्सिन (A1AT) हे यकृतामध्ये आढळणारे प्रथिनांचा एक प्रकार आहे आणि शरीराच्या ऊतींचे संरक्षण करते. संशोधनानुसार, स्मोकिंग न करणार्यांपेक्षा स्मोकिंग करणार्यांमध्ये अल्फा-१ अँटी-ट्रिप्सिन पातळी 'लक्षणीयपणे कमी' होते. संशोधनात असे आढळून आले आहे की, हार्ट अॅटकदरम्यान स्मोकिंग करणाऱ्यांमध्ये A1AT चे उच्च पातळी त्यांच्या बचावण्याची शक्यता वाढवते आणि वर नमूद केल्याप्रमाणे, स्मोकिंग करणाऱ्यांमध्ये अल्फा-१ अँटी-ट्रिप्सिनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशा लोकांमध्ये हार्ट अॅटकचा धोका कमी होतो.
संशोधनाचे निष्कर्ष जाणून घेतल्यानंतर तुम्ही स्मोकिंग सुरू केले पाहिजे असा अर्थ आजिबात नाही. संशोधकांनी हा निष्कर्ष समोर आला आहे पण त्यावर अजून आणखी रिसर्च करण्याची गरज आहे, यावर जास्त भर दिला आहे.
एक्सपर्ट कोणालाही धुम्रपान करण्याचा सल्ला देत नाही. त्यांच्या मते धूम्रपानाचे अनेक तोटे आहेत, जसे की,
कर्करोग
मधुमेह
संसर्ग
श्वासाचा त्रास
हृदयविकाराचा झटका
स्ट्रोक
रक्ताभिसरण समस्या
दंत समस्या
डोळ्यांची दृष्टी कमी होणे
प्रजनन क्षमता कमी होते
ऑस्टिओपोरोसिस
त्यामुळे, कोणीही स्मोकिंग नाही केले पाहिजे आणि जर स्मोकिंगची सवय असेल तर लवकारत लवकर सोडली पाहिजे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.