नवी दिल्ली : तंबाखूजन्य पदार्थांचा अवैध व्यापार ही जगासाठी एक मोठी समस्या ठरली आहे. यामध्ये सिगारेट्सच्या तस्करीमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो ही धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या सिगारेट्सच्या तस्करीमुळं भारत सरकारचा तब्बल १३,३३१ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. गेल्या बारा वर्षांच्या तुलनेत हा महसूल बुडण्यात ४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं भारतासाठी ही चिंतेची बाब बनली आहे.