सोशल फोबिया असलेल्या समीरचं उदाहरण आपण गेल्या आठवड्यात बघितलं. त्याला दिलेल्या काही टिप्स बघितल्या. आता या विषयाचे इतर काही कंगोरे उलगडून बघू.
सगळ्यांत पहिल्यांदा ‘कुठंही काम करताना माझं सगळ्यांशी सौहार्दाचं, सलोख्याचं नातं असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तणावरहित असायला हवं. मी म्हणजे माझ्या आतला ‘मी’ स्वस्थ स्थिर, शांत, आनंदी असेन, तरच माझं सहकारी, वरिष्ठ किंवा कनिष्ठांबरोबरचं नातं माझ्यासाठी सौहार्दाचं असू शकतं.
मग माझा उत्साह, आत्मविश्वास, माझं कामातलं योगदान आणि समाधान वगैरे सगळ्याच गोष्टी जमून येतात. म्हणजेच मी स्वस्थ होत जाणं, माझी आंतरिक ताकद विकसित होत जाणं (Inward Journey) आणि माझं व्यक्तिमत्त्व प्रभावशाली होत जाणं, कौशल्य विकसित होत जाणं (External Journey) या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत,’ हे लक्षात घ्या.
सोशल फोबिया (भीती) पुढील प्रसंगात जाणवू शकतो
नवीन व्यक्तींना भेटताना
अधिकारी किंवा सन्माननीय व्यक्तींशी बोलताना
विद्यार्थ्यांच्या बाबतीत, वर्गात उठून काही बोलायच्या वेळी
ऑफिसमध्ये सादरीकरण (presentation) करताना
सभेत किंवा मीटिंगमध्ये बोलताना
सामाजिक कार्यक्रमात सहभागी होताना
सार्वजनिक स्वच्छतागृहे वापरताना
सार्वजनिक ठिकाणी जेवताना, खाता-पिताना
स्टेजवरून बोलताना किंवा भाषण करताना
गर्दीच्या ठिकाणी वावरताना
भीतीमधील भावनात्मक लक्षणं
दैनंदिन जीवनात सततची अस्वस्थता व सेल्फ-कॉन्शसनेस
ठरलेल्या कार्यक्रमाआधी किंवा घटनेआधी आठवडेच्या आठवडे किंवा कित्येक दिवस आधी भीती वाटायला सुरवात होणे
आपल्याकडे कुणीतरी सारखं बघतंय, लक्ष ठेवून आहे, जज करतंय अशी भीती वाटत राहणं
आपण चुकीचंच वागू असं सारखं वाटत राहणं
आपण नर्व्हस झालो आहोत हे इतरांच्या लक्षात येईल याची भीती वाटणं
भीतीमधील शारीरिक लक्षणं
चेहरा मलूल दिसणं
श्वासोच्छ्वास जोरात होणं
पोटात खड्डा पडणं
हात कापणं, आवाज कापणं
छातीत धडधडणं किंवा जड वाटू लागणं
तळव्यांना घाम येणं
चक्कर येणं
वागणुकीतील बदल, लक्षणं
समारंभांना किंवा गर्दी होणार असेल अशा ठिकाणी जाणं टाळू लागणं
अशा ठिकाणी जावंच लागलं, तर कुणी बघणार नाही अशा जागी थांबण्याचा प्रयत्न करणं किंवा लवकरात लवकर कुणाच्याही नकळत निघून जाण्याचा प्रयत्न करणं
बऱ्याचदा आनुवांशिकता, मेंदूतील रासायनिक असंतुलन, लहानपणापासून बनलेला मेंटल मेकअप या गोष्टींमुळे हा फोबिया निर्माण होऊ शकतो. आज या गोष्टीला सात-आठ महिने झाले. समीरमध्ये आमूलाग्र बदल झाला होता. त्यानंही मनापासून कष्ट घेतले आणि positive transformation घडू शकलं.
आता दैनंदिन रुटीनमधल्या मीटिंग्ज, कस्टमर मीटपासून प्रेझेंटेशन्सपर्यंत सगळ्याच गोष्टी विलक्षण आत्मविश्वासानं तो करू लागला. संध्याकाळी त्याच्याच कंपनीचा वार्षिक कार्यक्रम आहे. त्याचं सूत्रसंचालन समीर करतो आहे. मला खात्री आहे, ते तो उत्तमच करेल. मला प्रेक्षकात पाहिल्यावर आत्मविश्वासानं हात उंचावून स्मित करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.