चेतना तरंग : प्रेमाची परिभाषा..!

आपण प्रेम खूप अवास्तवपणे व्यक्त करतो ही आपली समस्या आहे. आपण प्रेम खूप अधिक व्यक्त करतो, तेव्हा कालांतराने अजून व्यक्त करण्याजोगे काही उरत नाही.
sri sri ravi shankar
sri sri ravi shankarSakal
Updated on

आपण प्रेम खूप अवास्तवपणे व्यक्त करतो ही आपली समस्या आहे. आपण प्रेम खूप अधिक व्यक्त करतो, तेव्हा कालांतराने अजून व्यक्त करण्याजोगे काही उरत नाही. ‘अरे, तू फारच सुंदर आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे,’ असे तुम्ही म्हणू शकता. हे केवळ शब्द झाले, नुसते विचार. आतमध्ये काही होत नाही आहे. आत काही उमलत नाही, आपण मनापासून बोलत नसतो.

म्हणून आपण, ‘हो, माझे तुझ्यावर खरच प्रेम आहे,’ असे म्हणून समोरच्या व्यक्तीला दिलासा देण्याचा प्रयत्न करतो. ते ओसंडून वाहत नाही तेव्हा तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता, की तुम्ही अजून त्यांच्यावर प्रेम करता आणि अधिक प्रेम निर्माण होताच आहे. परंतु तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे माहीत असते की जे आधी काहीतरी घडत होते ते आता नाहीय. म्हणून आपण केवळ या वास्तवाला मान्य करतो.

‘माझ्या प्रेमाला ते जबाबदार आहेत,’ असे आपण म्हणत नाही. माझ्या प्रेमाकरिता मीच जबाबदार आहे. मला आज प्रेमाची भावना होते आहे. कदाचित उद्या प्रेम जाणवणार नाही. स्वतःवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे उत्क्रांतीच्या मार्गावर जाणे. मग आपण विचार करू शकतो, ‘सर्वकाळ, आयुष्यभर मी प्रेमात कसे काय असू शकतो!’ तेव्हा आपल्या हृदयावरचे आणि मनावरचे आंतरिक अवजड ओझे उतरते. तुम्हाला इतरत्र प्रेम सापडते.

तेव्हा सतत त्याबद्दल विचार करीत राहता. तुम्ही त्यांची काळजी, त्यांच्याबरोबर असलेले तुमचे सख्य टिकवायचा प्रयत्न करता. समोरच्या व्यक्तीबरोबर असलेले सख्य सतत सिद्ध करण्यासाठी लागणारे इतके प्रचंड यत्न हेच समस्येचे मूळ आहे.

‘माझे तुझ्यावर प्रेम आहे,’ असे अमक्या तमक्याला पटवून देण्याची आवश्यकता नाही. कुणाला पटवून देणे म्हणजे आपल्या हाताने होडी उलटवणे होय.

खरे सख्य ते आहे ज्यामध्ये तुम्हाला जवळिकता आधीपासून वाटते. तुम्हाला ती कुणाला सिद्ध करून देण्याची किंवा जवळिकता आणण्याचे प्रयत्न करण्याची गरज नाही.

म्हणूनच प्रेम खूप अधिक प्रमाणात व्यक्त केले की ते अल्पायुषी होते. ते एका बीजाप्रमाणे असते. तुम्हाला ते पेरायचे असते आणि त्याला तसेच पुरलेले ठेवायला पाहिजे. कधीही जास्त व्यक्त करू नये. तुम्ही कुणावरही प्रेम करा पण ते असे करा की त्यांना त्याचा पत्तासुद्धा लागणार नाही. ते एक गुपित ठेवा. मग काय होईल? तुमच्या कृतींमधून तुमचे प्रेम फुलून येईल. सतत ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझे तुझ्यावर प्रेम आहे, आय लव्ह यू, आय लव्ह यू’ म्हटल्याने तुम्ही त्याचा चुराडा करता.

एक साक्षात्कारी व्यक्ती, ‘माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे,’ असे म्हणणार नाही. अशा व्यक्तीच्या उपस्थितीतच तुम्हाला प्रेम जाणवेल. प्रत्येक श्वासात प्रेम असेल. प्रत्येक कटाक्षात प्रेमाची अनुभूती येईल. उच्चारला जाणारा प्रत्येक शब्द तुम्ही ऐकाल तर तो प्रेमाने ओतप्रोत असेल. त्यांचे अस्तित्व हेच प्रेम असते. असे असते साक्षात्कारी प्रेम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.