प्रश्न - तुम्ही खऱ्या जवळीकीविषयी बोलाल का?
एक कळी उमलते तेव्हा तिचे फूल बनते. एक काळीज भंग पावते तेव्हा ते दैवी बनते. एक फूल पुन्हा उमलू शकत नाही. जे संपते, ती कळी असते आणि ती कायमची नष्ट होते तेव्हा तिचे फुलात रूपांतर होते. तुम्हाला प्रेम वाटले होते, ते प्रेम नव्हते. खऱ्या प्रेमामध्ये हृदय तुटत नाही. तुटलेले हृदय म्हणजे पूर्ण न झालेल्या मागण्या, अपुऱ्या राहिलेल्या अपेक्षा, तुटलेल्या आशा.
प्रेम कसे काय तुटू शकते? प्रेम तुटू शकत नाही. पाणी तुटू शकते का? प्रेम तरल आहे. तरल असते ते ठिसूळ नसते. कडक असते ते ठिसूळ असते, ते तुटले जाऊ शकते. जीवन परिपूर्ण आहे. ते ओढ्यासारखे आहे. ओढा स्वतःबरोबर पाने, कधी ओंडके, कधी बेडूक, कधी राजहंस, कधी मासे, कधी कचरा, कधी औद्योगिक टाकाऊ गोष्टी, सगळे काही घेऊन जातो. त्याची कशाबद्दल काहीही हरकत नसते.
‘अरे तू फूल आहेस, मी फक्त तुलाच वाहात घेऊन जाणार. तुम्ही मृत ओंडके आहात, मी तुम्हाला घेऊन नाही जाणार,’ असे तो म्हणतो का? तो कोणामध्ये काहीही भेदभाव करीत नाही. तुम्ही ओढ्याच्या पाण्यात दूध वगैरे चांगल्या वस्तू टाकल्या, तर तो त्याही वाहात घेऊन जातो. जीवन हे ओढ्याप्रमाणेच आहे.
घटना आणि लक्ष
घडणाऱ्या घटनांकडे जास्त लक्ष देऊ नका. तुम्ही घटनांना जास्त महत्त्व दिले, भूतकाळाला कवटाळून बसलात तर तिथेच राहाल. त्यांचा मोठा दगड होईल आणि तुम्ही बुडून जाल. घटना या शिळेप्रमाणे आहेत. त्या आहेत तिथेच राहतात. तुम्ही हलके राहा. तुम्ही ते सर्व सोडून द्या. काही काळजी करू नका. त्या दगडांना सारून पुढे जा. त्यांना सोडून निघून जा.
आयुष्य म्हणजे घटनांची शृंखला आहे. काही प्रिय, तर काही अप्रिय घटना, काही चांगल्या, तर काही वाईट घटना. कित्येकदा तुम्ही काही करीत होतात आणि अजाणतेपणी लोक दुखावले गेले होते. इतर दुखावले जाणार नाहीत याची अधिक काळजी घेण्याची तुमची इच्छा असते आणि तरीसुद्धा ते दुखावले जातात.
काहीवेळा तुमच्या नकळत तुम्ही लोकांना दुखावता. नेमकी हीच गोष्ट इतर लोकांच्या बाबतीतसुद्धा लागू होते. काहीवेळा त्यांच्या स्वतःच्या काही इच्छा-आकांक्षांमुळे लोक तुम्हाला दुखावतात. म्हणून मग त्यांना किंवा तुम्हाला आपल्या काळजाचे तुकडे-तुकडे झाल्यासारखे वाटते. परिपक्व मनाचा किंवा परिपक्व प्रेमाचा हा स्वभाव नव्हे.
म्हणून तुम्ही मित्राला किंवा जुन्या साथीदाराला पुन्हा भेटता तेव्हा भूतकाळात काही झालेच नव्हते, असे वागा. जणू काही तुम्ही त्यांना आता पहिल्यांदाच भेटता आहात. तुम्हाला कोणतेही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, तुम्ही काही काळ जोडीदार होतात. मग तुमची इच्छा असो वा नसो, काहीतरी झाले.
तुम्ही वेगळे झालात. मग काय झाले? परत त्यांच्याबरोबर संपर्क साधा, त्यांच्याबरोबर बोला. त्यांच्याबरोबर असा मैत्रीपूर्ण व्यवहार करा जणू काही घडलेच नव्हते. या जगात कोणीच तुमचा शत्रू नाही. असे जगा की तुम्हाला शत्रू नाहीच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.