आपण सगळे संसार सागरात आहोत. सगळी वेगवेगळी शरीरे हे शिंपले आहेत, ज्यामध्ये थोडे थोडे पाणी आहे. म्हणून नाव आणि शरीर एक आभास आहे. हे केवळ सापेक्ष अस्तित्व आहे. सत्संग म्हणजे अशी भावना की, अमुक-तमुक माझाच एक भाग आहे. तुम्हाला स्वतःमध्ये आणि इतर सर्वांमध्ये भरवसा आणि आत्मविश्वास वाटेल. आणि तुम्ही काळजी करत बसणार नाही की अमुक-तमुक तुमच्याबद्दल काय विचार करतो आहे.
चंद्रकांत तुमच्याविषयी काय विचार येतोय, मानसीला तुमच्याबद्दल काय वाटते आहे, शंतनु तुमच्याबद्दल काय विचार करतो आहे, त्यांना बरे वाटायला तुम्ही काय केले पाहिजे. हा सगळा गोंधळ नाहीसा होईल. कोणाला तरी बरे वाटावे किंवा त्याने चांगला विचार करावा, यासाठी प्रयत्न करणे म्हणजे खूपच निरर्थकपणाचे वाटेल. तुम्ही निश्चिंत व्हाल!
हे खरे सख्य आहे. तुम्ही असे गृहीत धरून चला की, तुमची सर्वांबरोबर जवळीक आहे. वास्तविक तर हे आहे की, तुम्हाला खऱ्या स्वत्वासोबत जवळीक असणे याशिवाय काहीही पर्याय नाही. काही काळ तुम्ही तसे वागू नाही शकत, तरी ते सत्य नाही. तुम्ही आधीपासून जोडलेले आहात. आणि समोरच्या व्यक्तीकडून जवळिकीची मान्यता मिळण्याची अपेक्षा ठेवू नका. त्यामुळे तुमचे स्वतःचे सख्य नष्ट पावेल.
तुम्ही विचार करत राहिलात, ‘मला वाटते तसेच सुधीरलाही वाटते आहे, की त्याला काही वेगळे वाटते आहे? अशी नुसती शंका मनात डोकावली तर तुम्ही गोष्टींचे निरक्षण करणे सुरू कराल. तुम्ही एक पाऊल मागे घ्याल. म्हणून सुधीरला कसे वाटते याची पर्वा करू नका. त्याला काहीपण करू देत, परंतु तुम्ही मात्र त्याच्याबरोबर सख्य कायम ठेवा. त्याला काय वाटते तो त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला वाटते की तो तुमचा आहे, तर तुम्ही त्याप्रमाणे वर्तन ठेवा.
तुम्हाला राग येत आहे तर रागवा. वाटले तर तुम्ही त्याला थोबाडीत मारली पाहिजे, तर द्या एक चपराक. ते सगळे करा, जे करणे तुम्हाला योग्य वाटते आहे. बस इतकेच! याचा अर्थ असा नाही की तुम्ही काळजी घेतली नाही पाहिजे किंवा खोलात विचार नाही केला पाहिजे. तुम्ही करता परंतु ते सगळे आपणहून उत्स्फूर्तपणे घडते आणि तुमच्या कृती या कोणत्याही प्रकारे त्याच्या प्रतिसादाला प्रतिक्रियात्मक असणार नाहीत.
खऱ्या जवळिकीमध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून प्रतिक्रियेची अपेक्षा ठेवत नाही. ती एक प्रतिक्रियारहित अभूतपूर्व घटना आहे. ही जवळीक आहे. जवळिकीतून प्रतिसादाची गरज असेल तर ती व्यवहार बनते. प्रतिसादाची वाट पाहू नका. तुम्ही प्रेमळ राहा, प्रेमाची ढेप बना. तुम्ही बसा, बोला, या, जा, काहीही करा. हे स्वातंत्र्य आहे.
प्रश्न : अहंकाराला सोडून देण्याच्या प्रक्रियेबरोबर कर्माचा काय संबंध आहे? अहंकार कसा सोडून द्यावा? त्याचा कर्माबरोबर काय संबंध आहे?
यासाठीच साक्षात्कारी व्यक्तीबरोबर तुमचा संपर्क असण्याची गरज आहे. साक्षात्कारी व्यक्तीबरोबर असलेले संबंध सर्व कर्मांचा नाश करतात. तुम्ही सोडून देऊ शकत नाही असे जेव्हा तुम्हाला जाणवते आणि खूप ओझे आहे असे वाटू लागते, तेव्हा शरण जा. अशा वेळी तुम्ही म्हणा, ‘‘माझे प्रिय गुरुदेव, या ओझ्यातून माझी सुटका करा, माझी मदत करा!’’ तुम्ही अहंकाराला सोडून देऊ शकत नाही, तेव्हाच तुमचे सद्गुरू तुमच्या मदतीला धावून येतात. मग तुम्ही पाहाल की ते ओझे नाहीसे होऊन जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.