Periods at early age: 'या' वयाच्या आधी मुलींना मासिक पाळी येणे आरोग्यासाठी धोकादायक, संशोधनातून माहिती समोर

मुलींनो 'या' वयापूर्वी मासिक पाळी येत असेल तर सावधान!
Periods at early age
Periods at early agesakal
Updated on

मुलींना 11 ते 15 वर्षे वयाच्या दरम्यान मासिक पाळी येण्यास सुरुवात होते, परंतु नुकत्याच झालेल्या संशोधनातून असे समोर आले आहे की ज्या मुलींना कमी वयात मासिक पाळी येणे सुरू होते त्यांना भविष्यात मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

संशोधनात काय म्हटले आहे

संशोधकांनी 1999 ते 2018 दरम्यान 20 ते 65 वयोगटातील 17,300 हून अधिक मुली आणि महिलांवर डेटा आयोजित केला. ज्यामध्ये त्यांना मासिक पाळी सुरू होण्याच्या वयाच्या आधारावर वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले गेले, ज्यामध्ये मुली 10, 11, 12, 13, 14, 15 आणि त्याहून अधिक वयाच्या होत्या.(What the research says)

बीएमजे न्यूट्रिशन प्रिव्हेन्शन अँड हेल्थ जर्नलमध्ये 5 डिसेंबर रोजी प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, कमी वयात मासिक पाळी आलेल्या महिलांना 65 व्या वर्षाआधीपासूनच स्ट्रोकचा धोका वाढतो, विशेषत: ज्या महिलांना वयाच्या 10 वर्षांहून कमी वयात मासिक पाळी सुरू झाली आहे.

Periods at early age
Fitness Tips : कपालभाती करताना 'या' चुका टाळा; तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत

लुईझियानामधील टुलेन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना आढळले की 1,773 महिलांना टाइप 2 मधुमेह होता आणि त्यापैकी 205 महिलांना हृदयाच्या समस्या होत्या. या सर्व महिला अशा होत्या ज्यांची मासिक पाळी 13 वर्षांहून कमी वयात सुरु झाली होती. 

या महिलांना जास्त धोका होता

संशोधनात असे आढळून आले आहे की ज्या मुलींची मासिक पाळी 10 किंवा त्यापेक्षा कमी वयात सुरू झाली त्यांना टाइप 2 मधुमेहाचा धोका 32 टक्के जास्त, तर, हेच प्रमाण वयाच्या 11 व्या वर्षी मासिक पाळी आलेल्यांमध्ये 14 टक्के जास्त धोका आणि 12 व्या वर्षी मासिक पाळी आलेल्यांमध्ये 29 टक्के जास्त धोका असल्याचे आढळून आले. .

पण, या महिलांमध्ये  कार्डियोवॅस्कुलर आजारपणांचा धोका मात्र कमीच होता, असंही निरीक्षणातून समोर आलं. (These women were at greater risk)

10 किंवा त्यापेक्षा कमी वयात मासिक पाळी सुरू झालेल्या मधुमेह असलेल्या महिलांना स्ट्रोकचा धोका जवळपास तिप्पट असतो.

BMJ मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाच्या निष्कर्षांच्या आधारे असे म्हटले आहे की मासिक पाळी उशिरा म्हणजेच १३ वर्षांच्या वयानंतर सुरू झाल्यास असे धोके कमी असतात. कारण जर मासिक पाळी लवकर सुरू झाली तर रजोनिवृत्तीपर्यंत बराच काळ शरीर इस्ट्रोजेनच्या संपर्कात राहते, ज्यामुळे ही समस्या उद्भवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.