- गौरी शिंगोटे, आर. डी., सी.ई.ओ. जुविनेट वेलबिंग
आपण वर्षभरात सुट्टीसाठी, तीर्थस्थळी, परदेशी असे निरनिराळ्या ठिकाणी पर्यटनाला जातो. नवनवीन प्रदेश, त्यांची संस्कृती व याबरोबरच त्यांच्या खाद्यसंस्कृतीचीही दखल घेतली जाते. परदेशी किंवा परप्रांतात प्रवास करताना प्रवासातील खाण्यामुळे आलेले आजारपण वेळीच काळजी घेतली न गेल्यास प्रवासाची सारी मजाच घालवते. अशावेळी काय काळजी घ्यावी ते पाहू.