Stomach Gas Remedy : पोट फुगलंय? 'या' उपयांनी लगेच मोकळा होईल पोटातला गॅस

बऱ्याचवेळा तीव्र वेदनाही होतात. अशावेळी पोटातला गॅस लगेच दूर करण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय
Stomach Gas Remedy
Stomach Gas Remedyesakal
Updated on

How to remove gas immediately : उलट-सुलट खाण्याने किंवा खूप वेळ पोट रिकामं ठेवल्यानं अ‍ॅसिडिटीने, गॅसमुळे पोट फुगल्यासारखं वाटतं. सतत ढेकर येते किंवा पाद सुटणे असे त्रास होतात. बऱ्याचवेळा तीव्र वेदनाही होतात. अशावेळी पोटातला गॅस लगेच दूर करण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय

यावर सब्जा हा उपाय आहे. तुळशीच्या बियांनाच सब्जाच्या बिया म्हणतात. ज्या अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यास मदत करतात.

औषध कसे बनवायचे?

साहित्य

१ चमचा सब्जा,

१ ग्लास कोमट पाणी

३-४ पुदिन्याची पाने

Stomach Gas Remedy
उष्णतेमुळे हैराण झालात? मग आहारात करा सब्जा बीचा समावेश

कृती

तुळशीच्या बिया आणि पुदिन्याची पाने कोमट पाण्यात १० मिनिटे भिजवून ठेवा. १० मिनिटांनंतर तुम्ही हे घरगुती औषध घेऊ शकता. हा घरगुती उपाय पोटातील वायू दूर करण्यासोबत छातीत जळजळीवरही रामबाण उपाय आहे.

Stomach Gas Remedy
गॅस टँकरमधील गॅ’सची चोरी

पोटातील गॅस काढून टाकणाऱ्या सब्जाच्या बिया

तुळशीच्या बिया हे नैसर्गिक थंड घटक आहेत, जे पोटात तयार होणार्‍या ऍसिडचा (एचसीएल) प्रभाव कमी करतात.पोटातील गॅस आणि छातीत जळजळ यापासून त्वरित आराम मिळतो.

Stomach Gas Remedy
Health : पोटात गॅस होण्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका

पोट साफ होण्यासाठी गुणकारी रस

तुळशीच्या बियांचा रस पोट साफ करण्यासाठी फायदेशीर आहे. हे एक डिटॉक्स पेय आहे, जे पोटाच्या आतड्यांमधून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. यामुळे पोटात गॅस, छातीत जळजळ, पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून त्वरित आराम मिळतो.

बद्धकोष्ठतेवर प्रभावी उपचार सब्जा

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल आणि टॉयलेट मध्ये तासनतास वेळ जात असेल तर सब्जाच्या बियांचे सेवन सुरू करा कारण, फक्त १ चमचा सब्जाच्या बियांमध्ये २५% फायबर असते, जे बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यास मदत करते.

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते

सब्जाच्या बियांमध्ये पेक्टिन असते, जे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. हा घटक पोटात कोलेस्टेरॉलचे शोषण वाढवतो. हेल्थलाइननुसार, तुळशीच्या बियांचे दररोज सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल ८ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.