Stomach Is Human's Second Brain : मूड चांगला असेल, टेन्शन नसेल, तर मेंदू सिग्नल देतो तेव्हा पोट जेवण पचविण्यासाठी सज्ज होते. जेव्हा हृदय आणि मन अस्वस्थ असतं तेव्हा मेंदू सिग्नल देतो आणि पोटात गोळा येतो, पोट खराब होतंबऱ्याचदा आपल्यासमोर एखादी चवदार गोष्ट आली, की आपला मेंदू आतड्याला एक सिग्नल पाठवतो की समोर काहीतरी चांगलं दिसतंय, खायला तयार रहा!
जेव्हा एखाद्या व्यक्तीला परीक्षेची किंवा मुलाखतीची चिंता किंवा तणाव जाणवतो तेव्हा अनेकदा पोट खराब होतं. पोटात गोळा येतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास याला मेंदू आणि पोटातील मैत्री म्हणतात. मेंदू आणि पोट यांच्यात घडणाऱ्या या गोष्टी आहेत.मेंदू आणि पोट यांच्यातील असा संवाद हा रोजचाच आहे. मूड चांगला असेल, टेन्शन नसेल, तर मेंदू सिग्नल देतो तेव्हा पोट जेवण पचविण्यासाठी सज्ज होते. जेव्हा हृदय आणि मन अस्वस्थ असतं तेव्हा मेंदू सिग्नल देतो आणि पोटात गोळा येतो, पोट खराब होते.
कारण पोटाच्या इच्छा या मेंदूच्या अवस्थेवर अवलंबून असतात. टेन्शनच्या वेळी पोट दुखणे आणि टेन्शन फ्री असताना जास्त खाणे, याला पोट आणि मेंदूचा संबंध म्हणतात. वैद्यकीय भाषेत त्याला गट-ब्रेन कनेक्शन म्हणतात.तज्ञ सांगतात की, संवाद प्रणालीला वैद्यकीय शास्त्रात गट-ब्रेन अॅक्सिस म्हणतात. अभ्यासात असे आढळून आले आहे की मेंदूचा पोटावर आणि पोटाचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, म्हणजेच दोघांचाही एकमेकांवर परिणाम होतो.
मेंदू आणि पोट यांच्यातील संवादाचे जाळे कसे चालते?
गट-ब्रेन एक्सिस हे आतडे आणि मेंदूला जोडणारे नेटवर्क आहे. मेंदू शारीरिक आणि जैवरासायनिकदृष्ट्या पोटाशी जोडलेला असतो.मेंदूमध्ये न्यूरॉन आणि मध्यवर्ती मज्जासंस्था असतात, जे शरीराला कसे कार्य करायचे ते सांगतात. मानवी मेंदूमध्ये 10 अब्ज न्यूरॉन्स असतात. एक प्रकारे ते शरीरात पोस्टमनची भूमिका बजावते. ते मेंदूपासून शरीराच्या इतर भागांमध्ये माहिती प्रसारित करतात.
व्हॅगस नर्व्ह : मेंदू आणि पोट यांच्यातील पूल
मजेची गोष्ट अशी आहे की आतड्यात 500 दशलक्ष न्यूरॉन्स देखील असतात जे मेंदूच्या मज्जासंस्थेशी जोडलेले असतात. व्हॅगस नर्व्ह हा सर्वात मोठा मज्जातंतू आहे जो मेंदूला पोटाशी जोडतो. हे केबल वायर किंवा ब्रिजसारखे काम करते. मेंदू आणि पोटादरम्यान व्हॅगस नर्व्हद्वारे सिग्नल पुढे-पुढे जातात.
एखाद्या व्यक्तीचे पोट आणि मेंदू देखील विविध प्रकारच्या रसायनांद्वारे जोडलेले असतात ज्यांना न्यूरोट्रांसमीटर म्हणतात. मेंदूमध्ये न्यूरोट्रांसमीटर तयार होतात. याद्वारे माणसाच्या भावना नियंत्रित होतात. सेरोटोनिन नावाचे न्यूरोट्रांसमीटर माणसाला आनंदी बनवते. हे बॉडी क्लॉक देखील नियंत्रित करते.
विशेष म्हणजे यातील अनेक न्यूरोट्रांसमीटर आतड्यांतील पेशी आणि तेथे राहणार्या कोट्यवधी सूक्ष्मजीवांनी बनवले आहेत. सेरोटोनिन हार्मोनचा मोठा भाग आतड्यात तयार होतो.गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सांगतात की, पोटातील सूक्ष्मजंतू गॅमा-अमीनोब्युटीरिक ऍसिड (GABA) नावाचे न्यूरोट्रांसमीटर तयार करतात जे भीती आणि नैराश्य नियंत्रित करतात.
उंदरांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की काही प्रोबायोटिक्स गॅमा-अमीनोब्युटीरिक ऍसिडचे उत्पादन वाढवतात. त्यामुळे चिंता आणि नैराश्य कमी होऊ लागते.मानवी पोटात लाखो सूक्ष्मजंतू असतात, जे इतर रसायने तयार करतात आणि मानवी मेंदूवर परिणाम करतात.अनेक शॉर्ट-चेन फॅटी ऍसिडस् (SCFA) आतड्यांतील सूक्ष्मजंतूंद्वारे तयार होतात. हे पाचक फायबरपासून बनलेले असतात. ही ऍसिड भूक कमी करून मेंदूवर परिणाम करू शकतात.
वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही तणावाचा सामना करावा लागत असेल तर तो व्हॅगस नर्व्हमधून येणा-या सिग्नलमध्ये अडथळा निर्माण करतो. हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टच्या रोगांचे कारण बनते.
पोट म्हणजे दुसरा मेंदूच आहे
पोट, ज्याला दुसरा मेंदू म्हणतात, तो माहितीवर प्रक्रिया करत नाही. तो फक्त त्याचे विचार मनापर्यंत पोचवतो. त्यावर कारवाई करण्याचे काम मेंदू करतो.उदाहरणार्थ, समजा आपण एखाद्या दुकानात समोसा खाल्ला आणि त्यामुळे पोटात बिघाड झाला, तर मेंदू ठरवतो की आता आपल्याला विशिष्ट दुकानातून समोसा खायचा नाही किंवा भविष्यात समोसा खायचा नाही. म्हणजे, जेव्हा जेव्हा आपण काही खाल्ल्यानंतर आजारी पडतो, तेव्हा मेंदू ते अन्न टाळण्याचा निर्णय घेतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.