Stress Management : कामाच्या ठिकाणी स्ट्रेस येतोय? टेन्शन घालवण्याचं हे आहे सिक्रेट

कामाच्या ठिकाणी ताणतणाव असेल तर त्याचा परिणाम आपल्या कामावर आणि आरोग्यावरही होतो. अशा वातावरणात आनंदी राहण्याच्या काही सिक्रेट टिप्स
Stress Management
Stress Managementesakal
Updated on

Stress Management At Work Place : कामाच्या ठिकाणी प्रत्येकालाच आनंदी आणि तणावमुक्त वातावरण मिळणं शक्य नाही. वाढत्या कामाचं प्रेशर, ऑफीस पॉलिटिक्स, सहकारी, बॉस अशा अनेक लोकांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ताण येत असतात.

कधी चिडचिडा बॉस मिळतो. कधी सहकाऱ्यांमधल्या स्पर्धेमुळे इर्षा वाढते. स्वतःच्या कामाचा ताण सावरता न आल्याने इतरांवर चीडचीड केली जाते. सहकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या कुरघोड्यांचा ताण येतो. अशा वेगवेगळ्या ताणाचा सामना करावा लागतो.

Stress Management
Stress Management : 'या' ट्रिक्सने कमी करा Office Stress

याचा परिणाम आरोग्यावर होतो. सतत तणावात राहिल्याने नकारात्मकता वाढते. स्ट्रेस तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी घातक ठरतो. कार्यक्षमता कमी होते. त्याचा कामावर परिणाम होतो. यासाठी काही टिप्स लक्षात ठेवा.

Stress Management
Stress Management : जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली कोमेजतायेत महिला, अभ्यासातून समोर

झोप पुर्ण घ्या

जेव्हा तुमची झोप पुर्ण होत नाही तेव्हा तुमची चीडचीड वाढते. त्यामुळे कामाच्या ठिकाणची आव्हानं तुम्हाला अधिक कठीण वाटतात. त्यामुळे पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे.

Stress Management
Stress Free : ताणतणावामुळे भणभणणारं डोकं असं करा शांत

नकारात्मक बोलणाऱ्यांपासून लांब रहा

जे लोक तणावपुर्ण वातावरणात काम करू शकतात अशा लोकांच्या सानिध्यात रहा. त्यांच्याकडून कामा करण्याची प्रेरणा मिळेल. शिवाय जे लोक नकारात्मक गप्पा मारतात अशा लोकांपासून लांब रहा.

सेलिब्रेट करा

ऑफिसमध्ये लहान सहान गोष्टी सेलिब्रेट करा. सेलिब्रेशन वातावरण आनंदी ठेवतं. त्यामुळे तात्पुरता का असेना ताण कमी होतो. नवी उर्जा मिळते.

ब्रेक घ्या

कामाच्या अधे मधे ब्रेक घ्या. तासा-दोन तासात १०-१५ मीनिटांचा ब्रेक तुम्हाला रिफ्रेश करतो. त्यामुळे तुम्हाला कामाची नवी उर्जा मिळते.

गाणे ऐका

ताण वाढलाय असं जाणवल्यास संगीत हे त्यावर उत्तम औषध ठरू शकेल. त्यामुळे शक्य असल्यास संगीत ऐकत काम करा. काम करताना कमी आवाजात संगीत ऐकत काम केल्याने ताण कमी होतो आणि कामात सुधार होतो.

सहानुभूती

सहकाऱ्यांविषयी आकस ठेवल्यास कामाचा ताण वाढतो. त्यामुळे सहकाऱ्यांशी सहनुभूतीने वागण्याचा प्रयत्न करा. शक्य तिथे मदत करा. यामुळे सकारात्मकता वाढून ताण कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.