Stress Management : संपूर्ण 24 तासात ही वेळ असते सर्वाधिक ताणाची? 'या' ट्रीक्स करतील रिलॅक्स

जर दिवसाची सुरुवात ताणात झाली तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर होतो.
Psychological Tricks
Psychological Tricksesakal
Updated on

Most Stressed Time Period In 24 Hours : बऱ्याच लोकांनी सकाळी उठल्यावर स्ट्रेस लेव्हल वाढल्याचं जाणवतं. कारण झोप घेऊन उठलेले असले तरी सकाळच्या वेळात खूप कामांची यादी समोर दिसत असते. पण तुम्ही याचा विचार केला आहे का की, सकाळच्या वेळात सर्वात जास्त स्ट्रेसवाला टाइम कोणता आहे?

एका अभ्यासातून समोर आलं आहे की, ७ वाजून २३ मिनीटे ही वेळ सर्वाधिक स्ट्रेसफूल असते. रिडर जायजेस्टमध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार एका अभ्यासातून समोर आलं आहे की, ७ वाजून २३ मिनीटे ही वेळ खूप ताणाची असते.

लंडनमध्ये २००० लोकांवर हा अभ्यास करण्यात आला आहे. ही वेळ थोडीफार पुढे मागे होत असते. पण या अभ्यासानुसार महिलांसाठी ७ वाजून ५० मिनीटे तर पुरुषांसाठी ८ वाजून ४३ मिनीटे ही वेळ सर्वात जास्त ताणाची असते.

Psychological Tricks
ताण कमी करायचाय? मग Stress Toys करा ट्राय

सकाळची वेळ ताणाची का असते?

सकाळी सर्वांनाच कामं भरपूर असतात, पण ते पूर्ण करायला वेळ कमी असतो. त्यामुळे कामं पटापट ओटोपण्याच्या मागे सर्व असतात. त्यामुळे तुम्हाला ताण जाणवतो. सतत सकाळच्या वेळात ताण अनुभवणे याचा तुमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. यामुळे या ताणातून बाहेर पडण्याचे उपाय तुम्हाला यायला हवेत. जाणून घेऊया उपाय...

Psychological Tricks
Stress Management : ताण-तणावाचे करा व्यवस्थापन; मानसिक विकारांपासून होईल रक्षण

पडदे उघडा

सकाळी उठल्याबरोबर पहिले पडदे उघडा आणि सूर्यप्रकाशाला घरात येऊ द्या. तज्ज्ञ सांगतात यामुळे तुमच्या मेंदूला मेलाटोनिन प्रॉडक्शन कमी करण्याचा सिग्नल जातो. शिवाय कोर्टिसोल वाढवतो. यामुळे शरीर जागृत झाल्याचं अनुभवतं. त्यामुळे फ्रेश आणि स्ट्रेस फ्री वाटतं.

आधीच तयारी करून ठेवा

सकाळी उठल्यावर कामांची धावपळ आणि गोंधळ होऊ नये म्हणून सकाळी करण्याच्या कामांची तयारी रात्रीच करून ठेवा. शिवाय सकाळी करण्याच्या कामांची यादीही तयार ठेवा. म्हणजे गडबड न होता सर्व कामं होतील. सकाळी कामाला जाण्याच्या कपड्यांना रात्रीच इस्त्री करा. म्हणजे सकाळी सर्व काम स्मूथली होतील आणि तुम्ही स्ट्रेस फ्री फील कराल.

Psychological Tricks
Stress Management : कामाच्या ठिकाणी स्ट्रेस येतोय? टेन्शन घालवण्याचं हे आहे सिक्रेट

पूर्ण झोप

जर तुम्हाला सकाळी स्ट्रेस फ्री रहायचं असेल तर रात्री पूर्ण झोप घेणं आवश्यक असतं. रात्रीच्या झोपेशी तडजोड करू नका. झोप झाली नाही तर सकाळी थकवा, चीडचीड वाटणारच.

ब्रीदिंग एक्सरसाइज

सकाळी उठल्यावर स्वतःसाठी १० मिनीट काढायला हवेत. याकाळात ब्रीदिंग एक्सरसाइज करा. यामुळे ताण कमी होतो. स्वतःचा थकवा घालवू शकाल. प्राणायामामुळे दिवसाची सुरुवात आनंदी होईल. म्हणून स्वतःसाठी १० मिनीट नक्की काढा.

थंड पाण्याने आंघोळ

सकाळी फ्रेश वाटण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करायला हवी. गार पाण्याने आंघोळ केल्याने ताण बाहेर पडतो असं तज्ज्ञ सांगतात. जेव्हा तुम्ही फ्रेश होऊन दिवसाची सुरूवात करतात तेव्हा स्ट्रेस तुमच्यापासून दूर राहतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.