Success Story : उद्योगपती रतन टाटांना आवडली देशपांडेंची 'ही' कल्पना अन् 'स्टार्टअप'मध्ये केली मोठी गुंतवणूक

भारतात उपचार घेणं दिवसेंदिवस महाग होत चाललंय. याचं एक प्रमुख कारण म्हणजे औषधांची (Generic Medicine) जास्त किंमत.
Success Story Arjun Deshpande
Success Story Arjun Deshpandeesakal
Updated on
Summary

अर्जुन देशपांडे यांनी लोकांना कमी किमतीत स्वस्त औषध मिळावीत यासाठी जेनेरिक आधार (Generic Aadhaar) नावाचा स्टार्टअप सुरू केला. याद्वारे त्यांनी लोकांना औषधांवर 90 टक्क्यांपर्यंत मोठी सूट दिली.

भारतात उपचार घेणं दिवसेंदिवस महाग होत चाललंय. याचं एक प्रमुख कारण म्हणजे औषधांची (Generic Medicine) जास्त किंमत. यातील अनेक औषधे विकत घेतल्याने सर्वसामान्यांची अवस्था बिकट होते. अनेकवेळा लोकं कर्जबाजारी होऊन औषध विकत घेतात तर अनेकवेळा पैशांअभावी ही औषध घेणं शक्य होत नाही.

आज आम्ही तुम्हाला अशा तरुणाची गोष्ट सांगणार आहोत, ज्यानं ही समस्या समजून घेतली आणि ती सोडवण्याचा निर्धार केला. लोकांना स्वस्तात औषधे देऊन 500 कोटींची कंपणी उभारली. हे कसं शक्य झालं तेच आज बघूया..

Success Story Arjun Deshpande
Cyclone Biparjoy Alert : कोकण किनारपट्टीवर 'या' कारणामुळं मोठ्या लाटा; तज्ज्ञांकडून महत्वाची अपडेट समोर

अर्जुन देशपांडेंनी सुरु केला जेनेरिक आधार नावाचा स्टार्टअप

अर्जुन देशपांडे यांनी लोकांना कमी किमतीत स्वस्त औषध मिळावीत यासाठी जेनेरिक आधार (Generic Aadhaar) नावाचा स्टार्टअप सुरू केला. याद्वारे त्यांनी लोकांना औषधांवर 90 टक्क्यांपर्यंत मोठी सूट दिली. हळूहळू, जेनेरिक बेस लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाला. कारण, त्यांना सामान्य मेडिकल स्टोअरपेक्षा 80 ते 90 टक्के कमी किमतीत औषध मिळत होती. ही त्याच्यासाठी मोठी दिलासा देणारी बाब होती.

Success Story Arjun Deshpande
'या' राज्यात काँग्रेसच्या अडचणी वाढल्या; राहुल गांधींसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कोर्टाचं समन्स

रतन टाटांना आवडली अर्जुन देशपांडेंची ही कल्पना

अर्जुन देशपांडे 16 वर्षांचे असताना त्यांनी सखोल संशोधन केलं की, मेडिकल स्टोअरमध्ये औषध इतकी महाग का विकली जातात? त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी जेनेरिक आधार सुरू केलं. त्याची सुरुवात त्यांनी एका दुकानातून केली. हळूहळू, त्यांच्या स्टार्टअपने शहरांमध्ये झपाट्याने विस्तार करण्यास सुरुवात केली आणि अल्पावधीतच बाजारपेठेत ठसा उमटवला.

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना जेव्हा अर्जुन देशपांडे यांची अनोखी कल्पना कळली तेव्हा ते प्रभावित झाले. त्यानंतर रतन टाटांनी त्यांच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली. यानंतर जेनेरिक आधारच्या व्यवसाय वेग घेतला. आज त्यांचे स्टार्टअप कंपनीत बदलले आहे आणि तिचे मूल्यांकन 500 कोटी रुपये आहे.

Success Story Arjun Deshpande
Belgaum : पती आईपासून विभक्त होत नव्हता म्हणून सुनेनं सासूचा केला खून; डोक्यात रॉडने हल्ला

जेनेरिक बेसची देशात 2000 स्टोअर्स

जेनेरिक आधारचे सध्या देशभरात 2000 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. या दुकानांमध्ये 10,000 कर्मचारी काम करतात. जेनेरिक बेसच्या माध्यमातून हजारो लोकांना कमी किमतीत औषधे तर मिळत आहेतच, पण अनेकांना रोजगारही मिळत आहे. अर्जुन देशपांडे आता देशातच नव्हे तर परदेशातही आपल्या कंपनीचा विस्तार करत आहेत.

Success Story Arjun Deshpande
धक्कादायक! 'या' नामांकित हॉस्पिटलमध्ये महिलेचा अर्धवट गर्भपात? आरोग्याधिकाऱ्यांचा छापा

सध्या ते बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि म्यानमार या देशांमध्ये आपली कंपनी विस्तारत आहे. अर्जुनने एका मुलाखतीत त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल सांगितलं. ते म्हणाले की दुबई, ओमान, कंबोडिया आणि व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये त्यांची स्टोअर उघडण्याची योजना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.