Sugarcane Juice Benefits : उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्याचे फायदे, लिव्हरला नॅचरली डिटॉक्स करण्यास उपयोगी

ऊसाच्या रसाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ऊसाच्या रसाने लिव्हर नॅचरली डिटॉक्स होते
Sugarcane Juice Benefits
Sugarcane Juice Benefitsesakal
Updated on

Sugarcane Juice Benefits : उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच लहान मुलांसह मोठ्यांचीही पावले शीतपेय व रसवंतींकडे वळू लागतात. अनेकांना ऊसाचा रस प्यायला आवडतं. ऊसाच्या रसाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ऊसाच्या रसाने लिव्हर नॅचरली डिटॉक्स होते. चला तर जाणून घेऊया ऊसाचा रस पिण्याचे फायदे.

ऊसाचा रस पिण्याचे 10 फायदे

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर

ऊसाचा रस मधुमेहाच्या रूग्णांसाठी फार फायद्याचा आहे. याच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहाते.

पचनशक्ती सुधारते

ऊसाच्या रसाने पचनशक्ती सुधारते आणि शरीरातील टॉक्झिक पदार्थ बाहेर पडतात.

Sugarcane Juice Benefits
Sugarcane Juice Benefits

लिव्हरची स्वच्छता

ऊसाच्या रसात असलेले अँटिऑक्सिडंट्स, एन्झाइम आणि अनेक पोषक तत्व लिव्हरला हेल्दी ठेवण्यास मदत करतात. हे लिव्हरमध्ये असलेले टॉक्झिक पदार्थ काढण्यास मदत करतात आणि संपूर्ण बॉडी डिटॉक्स करतात.

अशक्तपणा दूर करते

ऊसाच्या रसाने शरीरात जास्त उर्जा निर्माण होते. आणि अशक्तपणा दूर होतो.

वजन कमी करण्यासही फायदेदायी

उसाच्या रसाने वजन कमी होतं.यात शुगर लेव्हल कमी असल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.

Sugarcane Juice Benefits
Sugarcane Juice : उन्हाळा सुरू झालाय, उसाचा रस पिताय? फायदे एकदा वाचाच

किडनीसाठी ऊसाचा रस फायद्याचा

ऊसाचा रस किडनीसाठी फार फायद्याचा आहे. शरीरातील टॉक्झिक पदार्थ बाहेर काढत शरीरात यूरिन बनवण्याचं काम करतात. हे एक नॅचरल डायूरेटिक असतं. जे मूत्रमार्गाद्वारे शरीरातील घातक पदार्थ शरीराबाहेर काढते. किडनीच्या आत दडलेला मळसुद्धा बाहेर काढण्यासही ऊसाचा रस फायद्याचा ठरतो.

शरीरास हायड्रेट ठेवते

ऊसाचा रस बॉडीला हायड्रेट करते. याने हीट स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. ऊसाचा रस शरीर थंड ठेवण्यास मदत करते.

स्किनच्या आरोग्यासाठी फायदेदायी

ऊसाचा रस स्किनसाठीही फार चांगला असतो. यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बी-६ स्किनला हेल्दी ठेवण्यास मदत करते.

Sugarcane Juice Benefits
Summer Onion Crisis : उन्हाळी कांदा टिकविण्याचे बळिराजापुढे आव्हान! अवकाळी पावसामुळे कांदा सडतोय

अँटी एजिंग

ऊसाच्या रसात अँटी एजिंग गुण असतात. जे तुम्हाला वाढत्या वयातही तारूण्य जपण्यास मदत करतात.

ऊसाच्या रसात तुम्हाला सशक्त ठेवण्याची क्षमता असते. त्यात विटॅमिन सी, पोटॅशियम, फॉस्फरस आणि आयरन असते जे शरीराच्या विविध भागांसाठी फार फायद्याचं ठरतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.