Vishal Chordia : परिपूर्ण अन्नातून समाज सुदृढ करणारा ‘सुहाना’

समाज आणि व्यक्तींचे स्वास्थ हे अनेक बाबींवर अवलंबून आहे. त्यात अन्नाची भूमिका महत्त्वाची आहे. सात्त्विक अन्न हे मनाची प्रसन्नता आणि उत्तम आरोग्य देते.
Vishal Chordia
Vishal Chordiasakal
Updated on

समाज आणि व्यक्तींचे स्वास्थ हे अनेक बाबींवर अवलंबून आहे. त्यात अन्नाची भूमिका महत्त्वाची आहे. सात्त्विक अन्न हे मनाची प्रसन्नता आणि उत्तम आरोग्य देते. त्यामुळे दर्जेदार अन्नाच्या माध्यमातून एक सुदृढ समाज निर्मितीचे काम आम्ही हाती घेतले आहे. आमचे प्रत्येक उत्पादन हे आरोग्याची व्याख्या अधिक मजबूत करत नागरिकांना उत्तम स्वास्थ देणारे आहे. आज जगाचे आणि जीवनाचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे चांगल्या आहाराची आणि त्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होत आहे. आपण आरोग्याच्या दृष्टीने विकसित होत आहोत का, याचा विचार करण्याची वेळ सध्या आली आहे. त्या दृष्टीने देखील आम्ही काम सुरू केले आहे.

चांगल्या मिश्रणातून योग्य उत्पादन व चांगले आरोग्य निर्माण होते

कोणतीही बाब परिपूर्ण होण्यासाठी अनेक घटक आवश्यक असतात. ते सर्व घटक योग्य प्रमाणात व योग्य वेळी एकत्र येऊन त्याचे चांगले मिश्रण झाले तर ती बाब किंवा काम पूर्णत्वास जाते. जेवणाचे देखील तसेच आहे. अनेक बाबी मिळून रुचकर पदार्थ तयार होत असतात. आम्ही मिश्रणाच्या उद्योगात आहोत तर ही आमची नैतिक जबाबदारी आहे की, आम्ही चांगले मिश्रण म्हणजेच मसाले तयार करावे. कारण चांगल्या मिश्रणातून योग्य उत्पादन आणि त्या उत्पादनातून उत्तम आरोग्य निर्माण होत असते.

‘सुहाना स्वास्थ्यम्’ अस्तित्वाची व्याख्या व्यापक करत आहे

स्वास्थ हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा विषय आहे. आम्ही देखील त्याला प्राधान्य देतो. त्यामुळेच आम्ही ‘सकाळ आयोजित स्वास्थ्यम्’ उपक्रमात सहभागी झालो आहोत. त्याचे आम्हाला समाधान आहे. त्यामुळे आम्ही यापुढे कायम ‘स्वास्थ्यम्’च्या बरोबर राहणार आहोत. स्वास्थ ही एक मोठी आणि व्यापक व्याख्या आहे. त्याचा सर्वार्थाने विचार ‘स्वास्थ्यम्’मध्ये झाला आहे. त्यामुळेच ‘सुहाना स्वास्थ्यम्’ अस्तित्वाची व्याख्या व्यापक करत आहे. हा उपक्रम केवळ संकल्पनेपुरता मर्यादित राहिलेला नाही तर या संकल्पनांची अंमलबजावणी देखील झाली आहे. गेल्या दोन्ही सत्रांत या उपक्रमाचे स्वरूप वाढत गेल्याचे दिसते. ही वाढ केवळ संखेच्या दृष्‍टीने नाही तर उपक्रमाची खोली वाढविणारी आहे. हा विषय भाषेच्या पलिकडे जाणारा असून तो सर्वांशी संबंधित आहे. त्यामुळे ‘स्वास्थ्यम्’ हे देशापुरते मर्यादित राहणार नाही. त्याचे आयाम वाढत जाऊन भविष्यात त्याला भाषेची बंधने राहणार नाहीत, असा विश्वास आम्हाला आहे.

आपण आरोग्याच्या दृष्टीने विकसित होतोय का याचा विचार व्हावा

सध्या जगाचे आरोग्याच्या दृष्टीने स्वरूप झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे आहारासह आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्याचे दिसते. देशात आणि जगात व्यावसायिक आणि सोयी सुविधांच्या दृष्टीने अनेक विकासकामे होत आहेत. समाजाची प्रगती आणि देशाचा विकास होण्यासाठी असा विकास होणे आवश्यक आहे. मात्र आपण आरोग्याच्या दृष्टीने विकसित होत आहोत का याचा देखील विचार व्हायला हवा. हेच काम आम्ही व्यवसायाच्या माध्यमातून करत आहोत. बदललेली जीवनशैलीमुळे पोषक आहार घेणे किंवा मिळण्याचे प्रमाण घटले आहे. त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. योग्य पोषण मिळत नसल्याने बिघडलेल्या आरोग्याची स्थिती समजून घेण्यासाठी आम्ही पोषणाच्या अनुषंगाने काम करत आहोत. एखादी व्यक्ती निरोगी दिसते म्हणून ती निरोगी असेल असे नसते. त्यामुळे निरोगी दिसणे आणि निरोगी असणे यातील अंतर आम्हाला कमी करायचे आहे. त्यामुळे एक सामाजिक जबाबदारी म्हणून पोषण आहाराबाबतचा लेखाजोखा आम्ही योग्य त्या अभ्यासानंतर नागरिकांसमोर मांडत आहोत. जागतिकीकरणाच्या अनुषंगाने काय परिमाण झाले आहेत. फूड प्रक्रिया उद्योग, स्वास्थ आणि पोषणाबाबतची स्थिती काय आहे व यातून सकारात्मक बदल कसे होतील, याची सविस्तर माहिती आम्ही तयार करीत आहोत. संकेतस्थळाची निर्मितीही केली जाईल.

पर्यावरणाची साखळी लक्षात घेणे आवश्यक

झटपट तयार होणाऱ्या पदार्थांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पदार्थांचा स्वीकार वाढला आहे. भविष्यात या पदार्थांची आणखी आवश्यकता भासणार आहे. कारण गेल्या काही वर्षांत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र त्या तुलनेत बागायती जमीन वाढलेली नाही. नागरिकांना हवे तेवढे अन्न देण्यात फूड प्रक्रिया उद्योग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे अन्नावर प्रक्रिया केल्याशिवाय पर्याय नाही. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये देखील अनेक पर्याय आहेत. आज जगात अन्न पुरविण्यात समुद्र हा सर्वात मोठा घटक आहे. अन्न उपलब्ध करून देणाऱ्या सर्व पर्यायांवर पर्यावरणाचा परिमाण होत आहे. अन्न उगविण्यापासून ते शिजविण्यापर्यंतची एक साखळी असते. पर्यावरणाची ही साखळी लक्षात घेत त्यानुसार आपण वागले पाहिजे.

निसर्गाशी सुसंगत जीवनशैली ही एक संस्कृती व्हावी

‘लक्ष्य’ संस्थेच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त मुलांना खेळात येण्यासाठी प्रेरित करत आहेत. कारण खेळाचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे आम्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये नको, मैदानावर जा असा संदेश देतो. योग्य आहार आणि भरपूर पाणी पिलो तर आरोग्य चांगले होते. सध्या फार्मा इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या इंडस्ट्रीला आमचा विरोध नाही. मात्र ते कशाचे प्रतीक आहे, याचा विचार केला पाहिजे. आपण शारीरिकदृष्ट्या मजबूत आहोत की नाही याचा विचार करणे गरजेचे आहे. आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यावर त्या सोडविण्यापेक्षा त्या निर्माणच होणार नाही, यावर आमचा जास्त भर आहे. त्यासाठी काय करायचे असेल तर आम्हाला त्यात नियमित पुढाकार घ्यायचा आहे. त्याचाच एक भाग म्हणून मैदाने तयार करत आहोत. आम्ही खेळाच्या अनुषंगाने गुंतवणूक करीत आहोत. शरीराची काळजी घेतली तर उपचार घ्यावे लागणार नाहीत, असे आम्ही समजतो. आपली जीवनशैली ही सूर्याशी सुसंगत असावी. सकाळी लवकर उठणे व रात्री लवकर झोपणे अशी जीवनशैली व्हायला हवी. कारण निसर्गाने दिलेल्या बाबी आपण पाळल्या तर आपण अधिक शाश्वत होऊ. निसर्गाशी सुसंगत जीवनशैली ही एक संस्कृती व्हावी. निसर्गाशी कनेक्ट झालो की, आपण त्याचा एक भाग होतो. त्यातून अनेक दृष्टिकोन बदलतात.

आध्यात्मिक जोडीतूनही मिळते स्वास्थ

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याबरोबर आध्यात्मिक स्वास्थ्य देखील आवश्यक आहे. समाजाचे स्वास्थ्य अनेक बाबींवर अवलंबून आहे. व्यवसाय हा त्यातील एक भाग आहे. आपण कोणतीही बाब मानसिक किंवा शारीरिक न ठेवता त्या त्याला अध्यात्माची जोड दिली तर त्या कामाची व्याप्ती वाढते व त्यातून आंतरिक स्वास्थ्य मिळते. आध्यात्मिक भक्तीसाठी मी नवीन कोणत्या बाबीचा त्रास होतो. आज मला बरं वाटत नाहीये. मला शारीरिक त्रास आहे हे केवळ मी शरीरापुरते ठेवले तर माझ्या मनाला त्याचा त्रास होणार नाही. कौटुंबिक स्वास्थ्य हा तुमच्या भोवतालचा बाह्य भाग आहे. मात्र कौटुंबिक स्वास्थ्य हे तुमच्या स्वास्थ्याचे प्रतिबिंब असते. त्याचा कुटुंबातील सदस्यांवर परिणाम होतो. त्यामुळे आपले स्वास्थ्य चांगले ठेवण्यावर भर द्यायला हवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.