Sunflower Oil : स्वयंपाकात सूर्यफुलाचे तेल वापरल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

सूर्यफुलाच्या तेलाचे नियमित सेवन केल्याने हृदय दीर्घकाळ निरोगी राहू शकते. त्याचबरोबर हे तेल कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
Sunflower Oil
Sunflower Oil Esakal
Updated on

सूर्यफुलाचे तेल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, कार्बोहाइड्रेट, आयरन आणि सोडियम उपलब्ध असते. सूर्यफुलाच्या तेलाच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

सूर्यफुलांचे खरे महत्त्व आपल्या पूर्वजांना सुद्धा माहित होते, म्हणून आयुर्वेदातही यांना अतिशय महत्त्वाचा दर्जा दिला गेला आहे. यात अनेक पोषक घटक असतात, जे इतर पदार्थांमधून आपल्या शरीराला मिळत नाहीत. सूर्यफुलांच्या बियांना सुपरफूड असेही म्हटले जाते. आपल्या याच गुणांमुळे संपूर्ण जगात सूर्यफुलाच्या बिया अतिशय प्रसिद्ध आहेत. यांचा वापर फक्त निरोगी शरीरासाठी होत नाही तर या बिया शरीराला अनेक आजारांपासून देखील दूर ठेवतात. म्हणूनच स्वयंपाक करताना तुम्ही सूर्यफुलाच्या तेलाचा वापर करू शकतात. सूर्यफुलाच्या तेलाचा वापर केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

Sunflower Oil
Shravan Special Recipe : कांदा, लसूण न वापरता तयार करा चवदार बटाट्याची भाजी..

सूर्यफूल तेलाच्या मदतीने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. या तेलामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. सूर्यफूल तेलाच्या नियमित सेवनाने तुम्ही सर्दी, खोकला आणि इतर मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.

Sunflower Oil
Rakshabandhan : यंदाच्या रक्षाबंधनाला स्वत: तयार करा या ५ राख्या

सूर्यफुलाच्या तेलाचे नियमित सेवन केल्याने हृदय दीर्घकाळ निरोगी राहू शकते. त्याचबरोबर हे तेल कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. सूर्यफूल तेलामध्ये ॲलिक ॲसिड आढळून येते, जे हृदयाची काळजी घेण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात सूर्यफूल तेलाचा समावेश करू शकतात.

सूर्यफुलांच्या बियांना सुपरफूड असेही म्हटले जाते. आपल्या याच गुणांमुळे संपूर्ण जगात सूर्यफुलाच्या बिया अतिशय प्रसिद्ध आहेत. यांचा वापर फक्त निरोगी शरीरासाठी होत नाही तर या बिया शरीराला अनेक आजारांपासून देखील दूर ठेवतात. म्हणूनच स्वयंपाक करताना तुम्ही सूर्यफुलाच्या तेलाचा वापर करू शकतात. सूर्यफुलाच्या तेलाचा वापर केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.