सकाळ वृत्तसेवा
पुणे : रोजच्या दगदगीच्या आयुष्यात ठहराव जपण्यासाठी आणि शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मार्गदर्शन गरजेचे आहे. त्यामुळेच ‘सकाळ स्वास्थ्यम’ या उपक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात येत आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘वुई आर इन धिस टुगेदर’ मोहिमेंतर्गत विश्व कल्याणाच्या उद्देशाने ९ ते ११ डिसेंबर दरम्यान पुण्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी हा तीनदिवसीय उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.
युवकांतील कमालीचे लोकप्रिय कवी, खुमासदार वक्ते डॉ. कुमार विश्वास यांच्या हस्ते ‘सकाळ स्वास्थ्यम’चे उद्घाटन येत्या शुक्रवारी (ता. ९) होणार आहे.
‘सोहळा स्वास्थ्याचा, जागर आरोग्याचा’ या उपक्रमातून नागरिकांना आनंदी जीवनाचे धडे मिळणार आहेत.
‘सकाळ स्वास्थ्यम’च्या उद्घाटनाचा सोहळा शुक्रवारी (ता.९) सायंकाळी सहा वाजता स्वारगेटजवळील गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे.
डॉ. कुमार विश्वास यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाल्यावर ‘दैनंदिन जीवन समृद्ध करण्यासाठी रामायण आणि महाभारतातील शिकवण’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे.
‘सकाळ स्वास्थ्यम्’ उपक्रमांतर्गत नागरिकांना तंदुरुस्ती, योग, प्राणायाम, अध्यात्म आदींबाबतचे सखोल मार्गदर्शन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून मिळणार आहे.
तीन दिवसांत येणारे तज्ज्ञ आणि मार्गदर्शन
डॉ. हंसाजी योगेंद्र : योगासाठी सकस आहार आणि योगातून अध्यात्माकडे
कवी, व्याख्याते कुमार विश्वास : मानसिक आरोग्यासाठी कलेची साधना
अध्यात्म गुरू संत श्री गौरांग दास : अध्यात्म आणि मानसिक स्वास्थ्य
योग गुरू श्री एम : योग, प्राणायाम आणि निरोगी शरीर
नूपुर पाटील : सकस, जैविक आहार आणि आरोग्य
प्रियंका पटेल : साउंड बाथ थेरपी, मनाचे आणि शरीराचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी सौम्य आणि उपचारात्मक थेरपी
अभिनेत्री शिल्पा शेट्टी : योग, प्राणायाम आणि निरोगी जीवनशैली
सर्वेश शशी : आरोग्यासाठी अध्यात्म
अॅक्शन दिग्दर्शक चित्ता शेट्टी : मार्शल आर्ट्सद्वारे शारीरिक स्वास्थ्य
डॉ. राजेंद्र बर्वे - न्यू नॉर्मल आणि मनस्थिती
रितेश आणि जेनेलिया देशमुख - व्हेगन जीवनशैलीचा प्रवास
सूफी गायिका रुहानी सिस्टर्स व उस्ताद राशीद खान : मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत व गायनकार्यक्रमाला जाण्यासाठी...
कार्यक्रमाला जाण्यासाठी...
प्रत्येक कार्यक्रमासाठी स्वतंत्र प्रवेशिका आहेत. काही कार्यक्रम मात्र निमंत्रितांसाठी राखीव आहेत.
मोफत प्रवेशिका पुढील ठिकाणी उपलब्ध
पंडित फार्मस् : गेट नं. २, डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे.
SIILC : सकाळनगर, बेसमेंट बाणेर रोड, पुणे.
सीझन्स मॉल : बाटा शोरूम समोरील प्रवेशद्वार, हडपसर, पुणे.
सकाळ हेड ऑफिस : ग्राउंड फ्लोअर, बुधवार पेठ, पुणे.
सकाळ पिंपरी ऑफिस : बी-झोन बिल्डिंग पाचवा मजला, एम्पायर इस्टेट शेजारी, पिंपरी
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. मर्यादित प्रवेशिका.
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत
व्यक्तिगत सहभागासाठी : व्यक्तीचे नाव, वयोगट, पत्ता, नोकरी/व्यवसाय व संपर्क क्रमांक
संस्था व ग्रुप्सच्या सहभागासाठी : स्वयंसेवी तसेच व्यावसायिक संस्था, ग्रुप्सचे नाव, कार्य व प्रकल्पाची माहिती, पत्ता व संपर्क क्रमांक
‘स्वास्थ्यम्’ उपक्रमाच्या माहितीसाठी आणि त्या संदर्भातील अपडेट मिळविण्यासाठी वेबसाइटला भेट द्या.
https://www.globalswasthyam.com/
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.