Swasthyam 2022 : आत्मभान जागे करणारे : मार्शल आर्ट

चित्रपट उद्योगातील तब्बल पाच पिढ्यांतील कलाकारांना दिग्दर्शक चिता यज्ञेश शेट्टी मार्शल आर्टचे प्रशिक्षण देत आहेत.
cheetah yajnesh shetty
cheetah yajnesh shettysakal
Updated on
Summary

चित्रपट उद्योगातील तब्बल पाच पिढ्यांतील कलाकारांना दिग्दर्शक चिता यज्ञेश शेट्टी मार्शल आर्टचे प्रशिक्षण देत आहेत.

चित्रपट उद्योगातील तब्बल पाच पिढ्यांतील कलाकारांना दिग्दर्शक चिता यज्ञेश शेट्टी मार्शल आर्टचे प्रशिक्षण देत आहेत. मार्शल आर्ट ही केवळ युद्धकला नसून, ते आत्मभान जागे करणारे शास्त्र आहे, अशी भूमिका मांडणारे शेट्टी यांच्याशी साधलेला हा संवाद.

प्रश्न : चित्रपट अभिनेत्यांना सुपरस्टार बनविणारे तुमचे मार्शल आर्टचे करिअर कसे सुरू झाले?

चिता शेट्टी : साधारण तीस वर्षांपूर्वी मुंबईत आलो तेव्हा हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होतो. दिवसभराच्या व्यस्ततेमुळे मार्शल आर्टचा सराव करणे शक्य होत नव्हते. म्हणून मध्यरात्री हॉटेलच्या टेरेसवर सराव करायचो. एक दिवस मला हॉटेल व्यवस्थापकांच्या मुलांनी बघितले. त्यांनी मला मार्शल आर्ट शिकविण्याची विनंती केली. माझी नोकरी जाईल या भीतीने मी त्यांना ही गोष्ट कुणालाच सांगू नका असे सांगितले होते. एके दिवशी आमच्या अधिकाऱ्यांनी मला थेट ‘हेल्थ क्लब मॅनेजर’ म्हणून नियुक्ती दिली. आमच्या या क्लबमध्ये बॉलिवूडचे अभिनेते येत होते. त्यांच्याशी ओळख वाढली आणि तेथूनच माझा हा प्रवास सुरू झाला.

बॉलिवूडमध्ये तुम्ही कोणासोबत काम केले आहे? मार्शल आर्टने तुम्हाला काय दिले?

मी बॉलिवूडच्या पाच पिढ्यांतील कलाकारांसोबत काम केले आहे. दिलीपकुमार, देवानंद यांच्यापासून संजय दत्त, अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आदींना मार्शल आर्टचे प्रशिक्षण दिले आहे. आजवर दीडशेच्यावर चित्रपटांमध्ये काम केले आहे. या कामामुळे माझ्यात सकारात्मकता निर्माण होते. मार्शल आर्ट केवळ युद्धकला नसून, स्वसंरक्षण आणि आत्मभान जागे करणारी साधना आहे. आपल्या देशातच उगम पावलेली ही एक प्राचीन कला असून, परदेशातील लोकांनी ही कला आत्मसात करत खूप नाव कमाविले आहे. आपली प्राचीन कलेचे संवर्धन आणि जगभर प्रसार करण्याचे काम मी करतो. ‘गांधी’ चित्रपटापासून ते जॅकी चॅनपर्यंत अनेकांसोबत मी काम केले आहे. माझ्यासाठी खरे तर ही अभिमानाची गोष्ट आहे.

मार्शल आर्ट आणि भारतीय ज्ञान परंपरेबद्दल आपले मत काय?

केरळातील कलरीपट्टू नावाचे प्राचीन युद्ध शास्त्र आहे. येथूनच बौद्ध भिक्खू बोधिधर्मन यांनी चीनमध्ये हून राजवंशाला ही कला शिकविली. पुढे याच राजवंशाने चीनमध्ये कलरीपट्टू अर्थात मार्शल आर्टचा प्रसार केला. ही कला शरीर आणि मनाला संतुलीत ठेवण्याचे काम करते. काही काळ सराव केल्यास व्यक्ती एका चांगल्या आणि सकारात्मक जीवनशैलीशी जोडली जाते. यामुळे चांगल्या सवयी लागतात. मार्शल आर्ट युद्धाचे अथवा कुणाला मारण्याचे शास्त्र नाही, तर शांतता आणि सौहार्द्र प्रस्थापित करणारी कला आहे.

मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे काम तुम्ही करता, हा प्रकल्प नक्की काय आहे?

आजवर मी १० लाखांहून अधिक मुली आणि महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले आहे. साधारण २० राज्ये आणि १२ देशांमध्ये माझी प्रशिक्षण केंद्रे आहेत. आजवर आपण मानांकन प्राप्त करण्यासाठी बाहेरच्या देशातून मान्यता घेत होतो. आता बाहेरचे लोक आमच्या संस्थेची मान्यता घेत आहेत. अमेरिका, जर्मनी, हॉंगकॉंग, चीन, श्रीलंका आदी देशांतील मार्शल आर्टच्या संस्थांना आम्ही मान्यता देतो. काही राजघराणीही आमच्याशी संबंधित आहे. थायलंडचे राजघराणेही आमच्या कार्याची प्रशंसा करत असून, अमेरिकन मार्शल आर्ट कौन्सिल युनायटेड स्टेट मार्शल आर्ट हॉल ऑफ फेम, श्रीलंकेच्या वतीने स्टीमा हा पुरस्कार मिळाला आहे. केवळ मानवतेचे कार्य आम्ही करत आहोत. त्यासाठी मिळालेले हे प्रोत्साहन मिळाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठीही आम्ही काम करू इच्छितो.

तुमच्या पुण्यातील कार्यक्रमाबद्दल काय सांगाल?

खरे तर पुणे हे ज्ञान-विज्ञान आणि प्रज्ञावंतांचे शहर आहे. त्यामुळे मी स्वतः पुण्यात येण्यासाठी खूप उत्सुक आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याचा विचार कुठेतरी हरवला आहे. आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येकाने दिवसातील अर्धा ते एक तास व्यायाम आणि योगासनांसाठी देणे गरजेचे आहे. पुण्यात आल्यावर मी फिटनेससाठीचे प्रयोग आणि स्वसंरक्षणाचे काही कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करणार आहे. सगळीकडे नकारात्मकतेचे वातावरण पाहता आजच्या जगात महिलांबरोबरच पुरुषांनीही स्वसंरक्षणाचे धडे घेणे गरजेचे आहे. केवळ स्वसंरक्षणासाठी नाही, तर स्वतःचा आत्मविश्वास आणि आत्मभान जागे करण्याचे काम ही कला करते. त्याचे प्रदर्शन आणि सविस्तर माहिती माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल.

सध्याच्या नवीन जीवनपद्धतीमुळे लोकांमध्ये अनेक नवीन विकार आढळून येत आहेत. खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे अनेक आजार उद्‍भवतात. यावर उपाय म्हणून औषधोपचारासोबतच योग, ध्यानधारणादेखील सुदृढ आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने योग, प्राणायाम, संगीत, अध्यात्म यांचा अतिशय सुंदर मिलाफ म्हणजे ‘स्वास्थ्यम्‌’ हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाद्वारे शरीरस्वास्थ्य कसे टिकवले पाहिजे, हा संदेश यातून मिळणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमास मनापासून शुभेच्छा!

- डॉ. गजानन एकबोटे, कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.