Blood Cancer Symptoms: लक्षणे साधीच असतात; पण ती रक्ताच्या कर्करोगाचीही असू शकतात

ब्लड कॅन्सरच्या लक्षणांबद्दल बोलायचे झाले तर खोकला किंवा छातीत दुखू शकते. प्लीहामध्ये असामान्य रक्तपेशी तयार होऊ लागतात.
blood cancer symptoms
blood cancer symptomssakal
Updated on

Blood Cancer Symptoms : कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. ब्लड कॅन्सर देखील त्यापैकीच एक आहे. वैद्यकीय भाषेत याला ल्युकेमिया म्हणतात. ब्लड कॅन्सरचेही अनेक प्रकार आहेत. रक्त कर्करोगाचे बहुतेक प्रकार बोन मॅरोपासून सुरू होतात. हा मऊ स्पंजयुक्त ऊतक हाडांमध्ये आढळतो, जिथे रक्त पेशी तयार होतात.

रक्त कर्करोगाचे प्रकार

रक्त कर्करोगाचे प्रमुख प्रकार म्हणजे ल्युकेमिया, लिम्फोमा, मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम, मायलोप्रोलिफेरेटिव्ह डिसऑर्डर आणि मल्टीपल मायलोमा.

या सर्व प्रकारांचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात. त्यांची लक्षणे समान असू शकतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे खूप कठीण आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे त्याची लक्षणे अनेक रुग्णांमध्ये दिसून येत नाहीत. (symptoms of blood cancer types of blood cancer leukaemia)

blood cancer symptoms
Breast Cancer : या ६ लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका; असू शकतो स्तनांचा कर्करोग

रक्त कर्करोगाची लक्षणे

खोकला किंवा छातीत दुखणे

ब्लड कॅन्सरच्या लक्षणांबद्दल बोलायचे झाले तर खोकला किंवा छातीत दुखू शकते. प्लीहामध्ये असामान्य रक्तपेशी तयार होऊ लागतात. यामुळे असे घडते. जेव्हा शरीरात अशी चिन्हे दिसतात तेव्हा त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

वारंवार संक्रमण

वारंवार आजारी पडणे किंवा संसर्गास सहज बळी पडणे म्हणजे तुमच्या शरीरात पांढऱ्या रक्त पेशींची कमतरता असू शकते. त्यामुळे जेव्हाही असे होईल तेव्हा सावध राहा.

सहज जखम आणि रक्तस्राव

शरीरात विचित्र पुरळ उठणे, खाज सुटणे, सहज दुखापत होणे आणि रक्तस्त्राव होणे, ही रक्त कर्करोगाची लक्षणे असू शकतात. पुरेसे प्लेटलेट्स नसल्यामुळे असे होऊ शकते. प्लेटलेट्स रक्त गोठण्यास मदत करतात.

भूक न लागणे

मळमळ आणि भूक न लागणे ही देखील ब्लड कॅन्सरची लक्षणे असू शकतात. हे प्लीहामध्ये असामान्य रक्त पेशींच्या निर्मितीमुळे होऊ शकते. त्यामुळे तुमच्या पोटावरही दबाव येऊ शकतो.

blood cancer symptoms
Alcohol Addictions : घरच्या घरी असं सोडवा दारुचं व्यसन

नेहमी थकवा

शरीरात सतत अशक्तपणा आणि थकवा येणे ही देखील ब्लड कॅन्सरची लक्षणे असू शकतात. पुरेशा लाल रक्तपेशी नसल्यामुळे असे होऊ शकते. यामुळे अॅनिमिया होऊ शकतो.

या लक्षणांकडेही दुर्लक्ष करू नका

  • रात्री घाम येणे

  • श्वासोच्छवासाच्या समस्या

  • मानेमध्ये सुजलेल्या लिम्फ नोड्स

  • विनाकारण वजन कमी होणे

  • ब्रश करताना रक्तस्त्राव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.