- डॉ. कोमल बोरसे
आपण कायम उच्च रक्तदाब म्हणजेच हायपर टेन्शनविषयी बोलत असतो. हायपर टेन्शन विषयी लोकांमध्ये अधिक जागरूकता आहे. परंतु रक्तदाब वाढणे धोकादायक आहे, त्याच प्रमाणे एकदम कमी होणेही त्रासदायक आहे. परंतु याविषयी फारसे बोलले जात नाही. रक्तदाब कमी झाल्यावर काय करावे किंवा हा त्रास आहे त्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दल आपण माहिती घेऊयात.
रक्तदाब कमी होणे याला वैज्ञानिक भाषेमध्ये हायपोटेन्शन असे म्हणतात. तर किती डीपी असल्यावर हायपोटेन्शन असे म्हटले जाते हे समजून घेतले पाहिजे. सामान्यतः १२०/८० mm/Hg हा सामान्य रक्तदाब असतो. परंतु तो साधारणतः ९०/६० mm/Hg याच्यापेक्षा कमी व्हायला लागतो तेव्हा त्याला ‘लो बीपी’ म्हणजेच हायपोटेन्शन असे संबोधले जाते.
आता काही लोकांना हा प्रश्न पडला असेल माझा रक्तदाब तर कायम कमी असतो. परंतु मला काही त्रास होत नाही. अगदी बरोबर आहे, ‘लो बीपी’ चा सगळ्यांनाच त्रास होईल असे नाही. काही लोकांसाठी सामान्य असून ते लक्षात येत नाही, तर इतरांमध्ये चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा डोके खूप हलके वाटण्यासारखी लक्षणे दिसू शकतात.
साधारणपणे रक्तदाब पातळीमध्ये घसरण इजा, रक्तक्षय, इलेक्ट्रोलाइट्स पदार्थांमध्ये कमी किंवा काही औषधोपचारांमुळे असू शकते, कमी रक्तदाबाची लक्षणे गंभीर असल्यास, मूल्यमापन आणि अंतर्भूत कारणावर उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला योग्य असतो.
कमी रक्तदाबाचे उपचार मुख्यत्वे मीठ व साखर यांचे द्रावण किंवा इलेक्ट्रॉनिक्स पदार्थ भरपूर मात्रेत घेणे असे असू शकते. निम्न रक्तदाब काही अंतर्भूत असलेल्या समस्येमुळे होत असल्यास, अशा त्या अंतर्भूत कारणावर उपचार केल्याने तो सामान्यपणे रक्तदाबाला साधारण पातळीवर आणतो.
तुमचा रक्तदाब कमी होत असेल आणि तुमच्याकडे रक्तदाब तपासण्यासाठी मशीन उपलब्ध नसल्यास त्याबाबत योग्य माहिती मिळणार नाही. त्यावर वेळीच उपचार न केल्यास धोकादायक ठरू शकते. साधारणतः पुढील लक्षणे दिसत असल्यास तुम्ही घरीच प्रथमोपचार मीठ आणि साखरेचे पाणी पिणे हे करावे.
घेरी (चक्कर) येणे डोके खूप हलके वाटणे.
नजर धुळसर होणे.
अशक्तपणा, थकवा येणे.
नीट उभा राहता न येणे.
थंड आणि शुष्क त्वचा
बेशुद्ध होणे
रक्तदाब लक्षणीय घसरल्यास, जिवाला धोका असतो आणि त्या परिस्थितीला धक्का म्हणतात. अशा वेळेस, चिन्हे आणि लक्षणे वेगळी आणि अधिक गहन असतात. ती पुढीलप्रमाणे आहेत.
भ्रम (वयस्कर व्यक्तींमध्ये अधिक) श्वसन जलद आणि ठिसूळ होते.अशा वेळेस लवकर डॉक्टरांना संपर्क साधावा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.