Menopause Symptoms : महिलांनो, पिरेड्स येणे बंद झाल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या

हे बदल मेंटली आणि फिजिकली दोन्ही प्रकारचे असतात. पिरेड्स बंद होणे यालाच मेनोपॉज सुद्धा म्हणतात
Menopause
Menopausesakal
Updated on

Menopause Symptoms : पिरेड्स हा स्त्रियांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग असतो. एका महिलेच्या आयुष्यात जवळपास 30 ते 34 वर्षे पिरेड्स येतात. प्रजनन क्षमतापासून जुळलेले हे चक्र पुर्णपणे आयुष्याचा भाग बनतात. पण अशात एक वेळ अशी येते की पिरेड्स येणे बंद होतं. त्यामुळे शरीरावर त्याचा खूप खोलवर परिणाम होतो. हे बदल मेंटली आणि फिजिकली दोन्ही प्रकारचे असतात. पिरेड्स बंद होणे यालाच मेनोपॉज सुद्धा म्हणतात.

45 पासून 50 वर्षापर्यंत पीरेड्स पुर्णपणे बंद होतात. या मेनोपॉजमुळे होणारे बदल जाणून घेणे खूप जास्त गरजेचे असते. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (read symptoms of Menopause causes changes in body read story )

पीरेड्स बंद झाल्यानंतर हे लक्षणे दिसून येतात

मेनोपॉज कधीही अचानक होत नाही तर हळू हळू होतो. त्यामुळे शरीरात लक्षणे दिसायला सुरवात होतात.
अनियमित मासिक पाळी
हॉट फ्लॅश म्हणजेच अचानक गरम वाटणे आणि अचानक थंड वाटणे
रात्री झोपताना खूप जास्त घाम येणे.
वारंवार मूड बदलणे
डिप्रेशन
चिडचिड होणे
झोप न येणे, थकवा जाणवणे, डोकेदुखी होणे.
कोणत्या कामात मन न लागणे.

मेनोपॉजमुळे सेक्स लाइफवरही फरक पडतो

मेनोपॉजमुळे सेक्स हार्मोन कमी होतात.
वजाइना ड्राय होते.
यूरीन इंफेक्शन चा धोका वाढतो.
स्किन सेन्सेटीव आणि ड्राय होणे.
हाय कोलेस्ट्रॉल वाढणे

  • मेनोपॉजची वरील लक्षणे दिसल्यास डेली रुटीन आणि खानपानला सुधारा. सोबत एक्सरसाइज रुटीनमध्ये करा ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येणार.

  • रात्री घाम येत असेल तर अंघोळ करुन झोपा.

  • याशिवाय साइकोलॉजिस्टजवळ जा.

  • जर पिरेड्स बंद झाल्यानंतर डिप्रेशन, तणाव किंवा एकटं वाटत असेल तर कोणत्या थेरेपिस्ट जवळ जाणे कधीही चांगले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.